येस न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता (वि. प्र.) पुणे या संवर्गातील वरिष्ठ अधिकारी संजीव चोपडे यांची सचिव व सचिव समकक्ष कार्यकारी संचालक/महासंचालक (गट-अ) पदी पदोन्नती वर नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन आदेश २९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला.
जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (वि. प्र.) संजीव चोपडे हे पुण्याहून सोलापूर येथे नव्यानेच अस्थापित झालेल्या मुख्य अभियंता कार्यालयात कार्यरत होते. आता त्यांची पुणे स्थित महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, येथे कार्यकारी संचालक पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद ३० सप्टेंबर २०२६ रोजी हनुमंत धुमाळ यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त होत आहे.
संजीव चोपडे यांना नुकतेच सिंचनवाढी साठी केलेल्या भरीव कार्याबद्दल जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुणे येथे “राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता ” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या तत्पर सेवेची व उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन शासनाकडून ही पदोन्नती देण्यात आली आहे.













