सरकारी बँकांचा २८ ते ३० सप्टेंबर या काळात होणारा देशव्यापी संप स्थगित करण्यात आला आहे. संपाच्या संदर्भात इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) यांची एक बैठक झाली. त्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर यूएफबीयूने संप मागे घेतल्याचे जाहीर केले. ही माहिती यूएफबीयूने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात रविवारी रात्री दिली. तीन दिवसीय संप पुढे ढकलला गेल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.27 सप्टेंबरच्या रात्री इंडियन बँक्स असोशिएशन आणि UFBU च्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. 27 सप्टेंबरला रात्री 9.30 वाजता IBA आणि UFBU दरम्यान बैठक झाली असं UFBU ने सांगितलं. बैठकीत व्यापक चर्चा झाल्यानंतर ठरवण्यात आलं की, शनि्वारी सुट्टी जाहीर करण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती बनवण्यात येणार आहे. UFBU नुसार, ही समिती सर्व संभाव्य पर्यायांवर आणि सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करेल.









