सोलापूर : दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळातर्फे पर्युषण पर्वातील क्षमावली पर्वोत्सव व अनंत रोट हा धार्मिक महोत्सव उत्साहात पार पडला.
यावेळी शैक्षणिक कार्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अनिल जमगे यांच्या हस्ते “पंचमरत्न” शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष अनिल माणिकशेटे, उपाध्यक्ष देवेंद्र शेटगार, सहसचिव अनुप कस्तुरे,आनंद तालीकोटी, सागर शिरश्याड, राजेंद्र पाटील, राजकुमार कस्तुरकर, प्रशांत वर्धमाने, सुमेरचंद जमालपुरे, प्रशांत माणिकशेटे, प्रवीण सास्तुरे व मनीषा जमगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पंकजा पंडित यांच्या मंगलाचरण आणि मान्यवरांच्या दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर वर्षभरात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंडळाचे सदस्य जे. जे. पंडित यांनी क्षमावलीवर व्याख्यान दिले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळाचे गौरव अध्यक्ष महावीर शास्त्री यांनी केली. अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष अनिल जमगे यांनी सर्व पुरस्कारप्राप्त श्रावकांना शुभेच्छा दिल्या आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे तसेच समाजबांधवांना विविध प्रकारे मदत करण्याचे आवाहन केले.
पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापिका उज्वला पाटील व श्रावकांच्या वतीने सुनील व्हसाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिल माणिकशेटे यांनी केले. मंडळाचे सचिव देशभूषण व्हसाळे यांनी आभार मानले.
यांचा झाला सन्मान
“पंचमरत्न” शिक्षक पुरस्कार : मुख्याध्यापक उज्वला रमेश पाटील, क्रीडा शिक्षक सुहास मोतीचंद छंचूरे, प्राध्यापक मंजुनाथ इंद्रजीत किरणगी, शिक्षिका रेखा गुंडराव बोंदार्डे, शिक्षिका सुनिता धनंजय व्हसाळे. शिक्षकेतर कर्मचारी : मनोज अशोक कोटे.
दशलक्षण पर्वात उपवास करणारे: दिलीप जयपाल काकरंबे, मंगल राजकुमार पांढरे, नंदिनी बाहुबली व्हनकसे, अनिश संतोष कोटी, आशुतोष मनोज कोटे.
शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविणारे : राधिका अमोल पांढरे, किरणगी रितेश मंजुनाथ, आनंद प्रदीप पंडित, निहांश राहुल पांढरे. पदोन्रती: राहुल रजनीकांत कराडे. सेवानिवृत्ती: भरतेश्वर रत्नपारखे.
८१ व्या वर्षात पदार्पण : अरविंदजी जमगे आणि त्यांच्या पत्नी.









