राज्यातील पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून आजपासून आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यामुळे सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागात पदाधिकारी- तसेच मंत्री यांना कोणताही आढावा घेता येणार नाही.शासकीय कार्यक्रम घेता येणार नाही. सोलापूर महापालिकेचे महत्त्वाचे विषय असणारी सभा देखील आता आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे. विविध कामांचे उद्घाटन, मंत्री तसेच पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. आजपासून आचारसंहिता सुरू झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या गाड्या प्रशासनाकडे जमा झाल्या आहेत. आचारसंहिते मुळे फुकटात लावलेले डिजिटल आता दोन दिवसात आपोआप हटविले जातील.सोलापूर महापालिकेला पाणीपुरवठ्याचे 1483 कोटी रुपयांचे टेंडर काढता येणार नाही, भारतीय राष्ट्रीय महामार्गाने सोलापुरातील दोन उड्डाणपुलाचे टेंडर काढले असले तरीही त्यांना आचारसंहिता सुरू असेपर्यंत ऑर्डर देता येणार नाही. पंढरपूर कॉरिडॉर मधील बाधित लोकांना नुकसान भरपाई देता येणार नाही. शिवाय दुष्काळासंदर्भात देखील आता शासन निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन नुसारच निर्णय घेईल.राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये चुरशीच्या निवडणुका होतील. जेन जी इफेक्ट मुळे भाजप या निवडणुकीसाठी मोठी ताकद लावणार असे दिसते. उमेदवारी कोणाला मिळणार आणि कशा लढती होणार याचे चित्र 9 ऑक्टोबर रोजी स्पष्ट होईल. निवडणुकीची अधिसूचना 29 सप्टेंबर रोजी जाहीर होईल 6 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असेल तर सात ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होऊन नऊ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत असेल. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होईल. आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.आचारसंहितेमुळे पुढील 35 दिवस मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचा थाट बंद होणार आहे.










