पुण्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने येत्या २९ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी ‘महाकुंभ रोजगार मेळाव्या’ चे आयोजन करण्यात आले आहे.यामुळे युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. या मेळाव्यात विविध कंपन्या व आस्थापनातील संधी उपलब्ध असतील विद्यार्थी व उमेदवारांच्या सोयीसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये या मेळाव्याचे केंद्र ठेवण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत राज्यभरात एक हजार रोजगार मेळावे घेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. कौशल्य विकास विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम राज्यातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधींचे दार खुले करेल, असा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
इच्छुकांनी ,
www.rojgar.mshaswayam.go.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











