• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

Yes News Marathi by Yes News Marathi
September 7, 2026
in इतर घडामोडी
0
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- किशोरवयात प्रवेश करताना मुला-मुलींनी सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शातील फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. असुरक्षित स्पर्श हा अनुचित वर्तन असून, परिस्थितीनुसार तो कायद्याच्या कक्षेत येणारा गंभीर गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जागरूक राहून कोणत्याही अनुचित प्रकाराला घाबरून न जाता विश्वासू व्यक्ती अथवा संबंधित यंत्रणेकडे माहिती द्यावी, असे प्रतिपादन न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने झोपडपट्टी भागातील वस्तीपातळीवरील सह्याद्री प्राथमिक शाळेत सुरक्षित-असुरक्षित स्पर्श, लैंगिक गुन्हे तसेच पॉक्सो कायदा याबाबत आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी मंचावर ॲड. चैतन्य केंगार, ॲड. अनुराधा कदम, ॲड. लक्ष्मण पाटील, मुख्याध्यापिका फरजाना अत्तार, प्राचार्य नारायण जगताप, माऊली अवताडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची, कायदेशीर संरक्षणाची तसेच अडचणीच्या प्रसंगी उपलब्ध असलेल्या मदतीची माहिती देण्यात आली. ॲड. लक्ष्मण पाटील यांनी बालकांचे हक्क व बालविवाह प्रतिबंधक कायदा याबाबत मार्गदर्शन केले. ॲड. चैतन्य केंगार यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पुरविण्यात येणाऱ्या मोफत विधी सेवा, कायदेविषयक सल्ला व सहाय्याबाबत माहिती दिली.

ॲड. अनुराधा कदम यांनी शिक्षणाचा अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमादरम्यान विविध प्रश्न उपस्थित केले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. बालकांमध्ये लहान वयापासून सुरक्षिततेची जाणीव आणि कायदेविषयक सजगता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे मत शाळेच्या मुख्याध्यापिका फरजाना अत्तार व माऊली अवताडे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव अमोलकुमार देशपांडे यांच्या देखरेखीखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी व विधी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Previous Post

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Related Posts

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026