• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Yes News Marathi by Yes News Marathi
September 7, 2026
in मुख्य बातमी
0
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
0
SHARES
3
VIEWS

सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व बचावकार्यातील उल्लेखनीय कार्याची दखल; सहा पुरस्कारांनी सोलापूरचा सन्मान

सोलापूर : सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि बचावकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी, व्यक्ती व संस्थांचा मुंबई येथे आयोजित सहाव्या ‘सेफ-टेक पुरस्कार, परिषद व प्रदर्शन २०२६’मध्ये गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात सोलापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उत्कृष्ट कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत जिल्ह्याला एकूण सहा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

किंग्ज एक्सप्लो मीडिया यांच्या वतीने ३ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील हॉटेल ताज येथे ‘सहावा सेफ-टेक पुरस्कार, परिषद व प्रदर्शन २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन आणि बचावकार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३५ अधिकारी, व्यक्ती व संस्थांचा या वेळी गौरव करण्यात आला.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान

सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांना ‘बेस्ट ऑफिसर’ या विभागात ‘बेस्ट फायर फायटर अँड रेस्क्युअर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपत्तीच्या काळात तत्परतेने कार्यवाही करणे, बचावकार्याचे प्रभावी नियोजन आणि विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डीआरएफच्या जवानांचाही राष्ट्रीय स्तरावर गौरव

सोलापूर जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलातील (डीआरएफ) बजरंग होटकर, रामचंद्र वाघमारे, सागर धप्पाधुळे, शुभांगी गवते आणि अरुणा राठोड यांना पूरपरिस्थितीतील बचावकार्य, आग प्रतिबंधक उपाययोजना, आपत्कालीन बचावकार्य तसेच गर्दी नियंत्रणामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘फर्स्ट रिस्पॉन्डर अँड रेस्क्युअर’ या विभागात ‘बेस्ट फायर फायटर अँड रेस्क्युअर ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

तत्परता, धैर्य आणि सेवाभावाची राष्ट्रीय स्तरावर दखल

आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी आणि डीआरएफच्या जवानांनी तत्परता, धैर्य, शिस्त आणि सेवाभावाने काम केले आहे. पूर, आग, गर्दी नियंत्रण तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत करण्यात आलेल्या कार्याची या पुरस्कारांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

सोलापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळालेल्या या सन्मानाबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले तसेच डीआरएफच्या सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन केले. आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहून केलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांनी अधिकारी व जवानांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या सहा पुरस्कारांमुळे सोलापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेसह अधिकारी आणि बचाव पथकाच्या सेवाभावी कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, हा सन्मान जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरला आहे.

Previous Post

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

Next Post

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

Related Posts

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६
मुख्य बातमी

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

October 23, 2026
मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस
मुख्य बातमी

मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

October 23, 2026
शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप
मुख्य बातमी

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

October 22, 2026
पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल
मुख्य बातमी

पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

October 22, 2026
सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणातील एकूण १५ आरोपी अटकेत
मुख्य बातमी

सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणातील एकूण १५ आरोपी अटकेत

October 22, 2026
महापालिकेत शुकशुकाट…ना पदाधिकारी..ना अधिकारी..कार्यालय ओस पडली
मुख्य बातमी

महापालिकेत शुकशुकाट…ना पदाधिकारी..ना अधिकारी..कार्यालय ओस पडली

October 22, 2026
Next Post
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

October 23, 2026
मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

October 23, 2026
शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

October 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026