• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या कन्येची सुवर्ण भरारी! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वेदिका काबराला ‘गोल्ड मेडल’

Yes News Marathi by Yes News Marathi
September 4, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या कन्येची सुवर्ण भरारी! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वेदिका काबराला ‘गोल्ड मेडल’
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर: टेक्स्टाईल सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोलापूरची कन्या वेदिका आनंद काबरा हिने राष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान यश संपादन करत सोलापूरचे नाव देशभरात उंचावले आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था (NIFT) च्या दीक्षांत सभारंभात वेदिकाला ‘बेस्ट स्टुडंट’ (सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी) म्हणून सुवर्णपदक (Gold Medal) बहाल करण्यात आले.

भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात, भारताचे माननीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते वेदिकाला हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

देशातील सर्व २० NIFT कॅम्पसमध्ये अव्वल!
वेदिकाने २०२६ मध्ये NIFT, हैदराबाद येथून ‘फॅशन कम्युनिकेशन डिझाईन’ या अत्यंत लोकप्रिय शाखेतून ४ वर्षांची पदवी (Bachelors) पूर्ण केली. संपूर्ण भारतातील सर्व २० NIFT कॅम्पसमधून फॅशन कम्युनिकेशन शाखेत ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी’ म्हणून तिची निवड झाली. सोलापूरसारख्या शहरातून डिझाईन सारख्या क्षेत्रात एका मुलीने थेट राष्ट्रपतींच्या उपस्थितीत देशात प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकावण्याची ही सोलापूरच्या इतिहासातील दुर्मिळ घटना आहे.

IIT CEED मध्ये देशात दुसरा क्रमांक (AIR 2)
वेदिकाचे हे यश अपघाती नसून तिच्या सातत्यपूर्ण कष्टाचे फळ आहे. यापूर्वी तिने आयआयटीच्या IIT Master of Design प्रवेश परीक्षेत (CEE) संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक (AIR 02) पटकावून सोलापूरकरांना थक्क केले होते. सध्या ती IIT मुंबई येथून ‘मास्टर ऑफ इंटरॲक्शन डिझाईन’ (M.Des) ही २ वर्षांची उच्च पदवी घेत आहे.

BRDS सोलापूरचे मार्गदर्शन लाभले
वेदिकाने तिच्या बॅचलर आणि मास्टर पदवीच्या दोन्ही प्रवेश परीक्षांची तयारी सोलापूरमधील BRDS (भंवर राठोड डिझाईन स्टुडिओ) येथून केली. तिने आपल्या यशाचे श्रेय BRDS सोलापूरचे सेंटर हेड धर्मेश टांक आणि तेथील तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे.

वेदिकाच्या या अभूतपूर्व यशामुळे काबरा कुटुंबियांसह संपूर्ण सोलापूर जिल्हा अभिमानाने सुखावला आहे. तिच्या या यशाने डिझाईन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सोलापूरच्या हजारो विद्यार्थ्यांसाठी एक नवा आदर्श आणि प्रेरणा निर्माण केली आहे. संपूर्ण सोलापूर शहरातून वेदिकावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post

गेल्या 17 वर्षात सोलापूर जिल्ह्यात एकही अंगणवाडी मंजूर नाही…!

Next Post

सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!

Related Posts

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील
इतर घडामोडी

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
इतर घडामोडी

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026
सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया; पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची घेण्याची आज अंतिम मुदत.
इतर घडामोडी

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया; पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची घेण्याची आज अंतिम मुदत.

September 4, 2026
SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
Next Post
सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!

सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026
SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

September 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026