सोलापूर जिल्ह्यात गेल्या सतरा वर्षात एकही अंगणवाडी मंजूर झाली नाही. सोलापूर जिल्ह्यात सध्या 4700 अंगणवाड्या आहेत. यामध्ये अंगणवाडी मदतनीस तसेच सेविका यांची सुमारे 9000 पदे कार्यरत आहेत. अंगणवाडी बांधकामे, त्यांची दुरुस्ती, अंगणवाडीतील बालकाला दिला जाणारा आहार, तसेच अंगणवाडीतील साहित्य खरेदी यावर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. जिल्ह्यात अंगणवाड्यांची गरज असताना केंद्र सरकारकडून याबाबत एकही अंगणवाडी मंजूर केली नाही. सुमारे 550 ते 600 अंगणवाड्यांची प्रस्ताव यामुळे धूळ खात पडले आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता.










