सोलापूर : सोलापूर तेलगू नाभिक ज्ञाती संस्थेच्या वतीने चिमटेश्वर जयंतीनिमित्त सुनील नगर येथील चिमटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिमटेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, समाजबांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर विनायक कोंड्याल यांनी चिमटेश्वर महाराजांना अभिवादन करून उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.



यावेळी प्रभागाचे नगरसेवक सिद्धेश्वर कमटम,सिद्राम शावणपल्ली, चंद्रकांत कोंडूर संजय कोंडूर, श्रीहरी कोंडूर, श्रीनिवास शवनपल्ली, रवी शवनपल्ली योगेश कोंडूर, व्यंकटेश यालकंठी,अंबादास कोंडूर सतीश नागवेली अजय निम्मकंती आदी मन्यावर उपस्थित होते.











