• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

Yes News Marathi by Yes News Marathi
August 16, 2026
in मुख्य बातमी
0
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
0
SHARES
8
VIEWS

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाची कारवाई; गुन्ह्यातील आरोपींची संख्या २३ वर, १० जणांना अटक


सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोण्याच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर ऊर्फ मामा चंद्रकांत मोसले याच्याकडून मिळालेल्या अवैध पैशांची विल्हेवाट लावणारा रामदास झोळ तसेच त्याचे साथीदार राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.


मनोहर भोसले याच्याविरोधात कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२६ दाखल असून, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये २३ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणातील पीडितांकडून आणखी तक्रारी प्राप्त झाल्याने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मोसले व त्याच्या साथीदारांविरोधात एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली. या पथकाने कुर्डुवाडी पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात आतापर्यंत २३ आरोपी निष्पन्न केले असून १० आरोपींना अटक केली आहे.


पोलिसांच्या तपासानुसार, मनोहर मोसले हा अनिष्ट व अघोरी पूजा तसेच जादूटोण्याच्या माध्यमातून अनेक पीडितांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात अवैध पैसे मिळवत असल्याचा आरोप आहे. या पैशांची विल्हेवाट दत्तकला इन्स्टिट्यूट, स्वामी चिंचोळी, दौंड-पुणे या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांच्यामार्फत लावली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणात राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दोघांनाही १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मिळाली आहे. दरम्यान, रामदास झोळ हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Previous Post

जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान

Next Post

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

Related Posts

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!
मुख्य बातमी

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

October 2, 2026
बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!
मुख्य बातमी

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे युवा महोत्सवावर पुन्हा निर्विवाद वर्चस्व!

October 1, 2026
आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !
मुख्य बातमी

आयुक्तांचे आदेश कर्मचारी बसवतात धाब्यावर !

October 1, 2026
सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!
मुख्य बातमी

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

October 2, 2026
निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक
मुख्य बातमी

निवडणूक आयोगामुळे भाजप बॅक फुटवर,काँग्रेस आणि विरोधक आक्रमक

September 30, 2026
सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!
मुख्य बातमी

सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!

September 29, 2026
Next Post
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026