• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

Yes News Marathi by Yes News Marathi
July 1, 2026
in इतर घडामोडी
0
प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि समाजात वैचारिक समृद्धी निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘प्रिसिजन वाचन अभियानाला’ यंदा दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध साहित्यिक, कवी, गीतकार आणि प्रेरणादायी वक्ते प्रा. प्रवीण दवणे यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.२५ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे होणार आहे.

या मुलाखतीचे विशेष आकर्षण म्हणजे प्रा. प्रवीण दवणे यांची मुलाखत त्यांचेच चिरंजीव, युवा कवी, लेखक आणि प्राध्यापक आदित्य दवणे घेणार आहेत. दोन पिढ्यांमधील हा साहित्यसंवाद साहित्य, वाचनसंस्कृती, लेखनप्रवास, जीवनमूल्ये आणि नव्या पिढीच्या विचारविश्वावर आधारित असल्याने तो रसिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

प्रा. प्रवीण दवणे हे मराठी साहित्यविश्वातील लोकप्रिय आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या नावावर ११० हून अधिक पुस्तके आणि २,००० पेक्षा अधिक मराठी गीते आहेत. ‘सावर रे!’, ‘स्पर्शगंध’, ‘रंगमेध’ यांसारख्या पुस्तकांबरोबरच अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन आणि पटकथा लेखन केले आहे. प्रभावी वक्ते म्हणूनही त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे.

आदित्य दवणे हे नव्या पिढीतील आश्वासक कवी, लेखक, वक्ते आणि प्राध्यापक आहेत. ‘युवा बोध’ या लेखमालेद्वारे त्यांनी तरुणांशी संवाद साधला असून ‘नातवंडांच्या कविता’ आणि ‘द पॉइटरी क्लब’ यांसारख्या उपक्रमांमुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून प्रिसिजन वाचन अभियानाच्या माध्यमातून विविध साहित्यिक, विचारवंत, लेखक आणि मान्यवरांच्या मुलाखती, व्याख्याने व संवाद आयोजित करून सोलापूरमध्ये वाचनसंस्कृतीला चालना देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. “वाचनातून घडते विचारांची पिढी… आणि विचारातून घडतो समृद्ध समाज” हा संदेश घेऊन राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

या विशेष कार्यक्रमाचा लाभ साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच प्रेरणादायी विचारांची आवड असलेल्या सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

Related Posts

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026