सुधारित पेन्शन योजना तसेच सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करावे आदी प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी आज संपावर जात आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना या संपातून वगळण्यात आले आहे. या संपामध्ये राज्यातील सर्व जिल्हा परिषद कर्मचारी सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक संपावर जाणार आहेत. संप मोडून काढण्यासाठी हा संप शासनाने बेकायदेशीर ठरवला आहे. राज्यातील कर्मचारी संघटनांबरोबर शासनाच्या प्रतिनिधींनी अद्याप कोणतीही चर्चा केली नाही त्यामुळे आजच्या संपामुळे राज्यातील सर्व सरकारी कामकाज ठप्प होण्याची भीती आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरू राहील असा संघटनेने इशारा दिला आहे.

