रायगड – छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक हे क्रांतीकारी पाऊल होते असे उद्गार सुधाकर इंगळे महाराज यांनी दुर्गराज किल्ले रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 353 वा राज्याभिषेक दिना निमित्त कोकण कडा मित्र मंडळ, महाड व रायगड प्रतिष्ठान सोलापूर आयोजित कार्यक्रमा मध्ये काढले. ते पुढे म्हणाले की, वर्तमान परिस्थिती नुसार राज्याभिषेक करणे खूपच आवश्यक होते. राजमुद्रा ही संस्कृत मध्ये असावी हा निश्चय म्हणजे क्रांतीकारी निर्णय होता. या रायगड किल्ल्यावर तीन राजांचे राजाभिषेक झाले आहेत, त्याचा तो प्रमुख साक्षीदार आहे. रायगड किल्ल्यावरील राजसदरे स्वराज्या तील प्रत्येक व्यक्तीचा न्याय निवाडा झाला. योग्य आणि प्रामाणिक न्याय ही स्वराज्याची ओळख होती. अशा राजसदरेवर कीर्तन करण्याचा योग मला पूर्व पुण्याईने प्राप्त झाला.यंदाचे हे चौथे वर्ष होते, असे ही ते म्हणाले.
प्रत्येक भाविकाच्या कपाळावर जो बुक्का आहे. तो फक्त शिवारायांच्या मुळे आहे. प्रत्येक मंदिरातील काकडा आरती, हरिपाठ, भजन, इ. होत आहे. वारी निमित्त निघणारा पालखी सोहळा हे सर्व फक्त शिवारायांच्यामुळेच होत आहे. अशा शिवारायांच्या जीवनातील सुवर्ण क्षण- ऐतिहासिक क्रांती म्हणजे राज्याभिषेक सोहळा आहे. त्यामुळे या दिनाला हिंदू साम्राज्य दिन असे ओळखलं जाऊ लागल आहे. या कार्यक्रमासाठी शिवाजी (भाऊ) भोसले, ह भ प जोतिराम चांगभले, विठ्ठल मोलाणे, इ पदाधिकारी परिश्रम घेत होते.











