• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऑर्किडच्या दोन विद्यार्थिनींची पॅरिस येथील ISAE SUPMECA मध्ये पूर्णतः प्रायोजित ४ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
February 14, 2026
in मुख्य बातमी
0
ऑर्किडच्या दोन विद्यार्थिनींची पॅरिस येथील ISAE SUPMECA मध्ये पूर्णतः प्रायोजित ४ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहरासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक अशी कामगिरी करत नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोलापूर येथील अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थिनींची पॅरिस, फ्रान्स येथील जागतिक कीर्तीच्या आयएसएई सुपमेका विद्यापीठात पूर्णतः प्रायोजित चार महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. मेकॅनिकल व एरोस्पेस अभियांत्रिकी क्षेत्रातील हे विद्यापीठ जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आहे. मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागात अंतिम वर्षात शिकणाऱ्या कु. स्नेहल शिंदे आणि इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग अंतिम वर्षात शिकणाऱ्या कु. समीक्षा सत्रे या दोन विद्यार्थिनी १६ फेब्रुवारी २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत आयएसएई सुपमेका येथे प्रगत शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण घेणार आहेत. या दोन्ही विद्यार्थिनींना इंटर्नशिपसाठी ला फाऊंडेशन डेसॉल्ट सिस्टीम्स यांचे पूर्णतः प्रायोजित आर्थिक सहकार्य तसेच फ्रेंच विद्यापीठाकडून 1300 युरो शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थिनींना दरमहा ६७० युरो स्टायपेंड देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे ही केवळ प्रतिष्ठेचीच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही समर्थित अशी आंतरराष्ट्रीय संधी आहे.

सोलापूरसारख्या टियर-२ शहरातील विद्यार्थ्यांसाठी ही जागतिक स्तरावरील दुर्मीळ संधी मानली जाते. गेल्या सलग तीन वर्षांपासून ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाने फ्रान्समधील नामांकित विद्यापीठांसोबत अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देत सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य संस्था म्हणून ओळख निर्माण केली आहे. यामुळे भारत-फ्रान्स शैक्षणिक सहकार्य अधिक बळकट झाले आहे. या दोन विद्यार्थिनी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फ्रान्सकडे प्रस्थान करणार आहेत.
इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थिनी पुढील अत्याधुनिक तंत्रज्ञान विषयांवर कार्य करणार आहेत :
• “गाईडन्स, नेव्हीगेशन ॲण्ड कंट्रोल प्रशिक्षण व स्पर्धेसाठी मॉड्युलर ड्रोन अरेनाचे डिझाईन व अंमलबजावणी”
• “संपूर्ण इंडस्ट्री 5.0 उत्पादन लाईनचे मेकॅट्रॉनिक्स मॉडेलिंग”
या प्रकल्पांमध्ये ड्रोन तंत्रज्ञान, स्वयंचलित नेव्हिगेशन, एम्बेडेड सिस्टीम्स, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्री 5.0 एकत्रीकरण आणि प्रगत मेकॅट्रॉनिक्स मॉडेलिंग यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांवर काम केले जाणार आहे. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप कार्यक्रमासाठी डॉ. श्रीनिवास एस. मेतन हे प्रोजेक्ट मेंटर म्हणून कार्यरत असून ते पॅरिस येथील प्रा. रोमन डेलाबेये (आयएसएई सुपमेका) यांच्या सहकार्याने विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणार आहेत. या संयुक्त मार्गदर्शनातून दोन्ही संस्थांमधील मजबूत शैक्षणिक व संशोधन सहकार्य अधोरेखित होते.
प्रज्ञा निकेतन एज्युकेशन सोसायटीचे माननीय सचिव विलास पाटील तसेच अध्यक्ष अंकुश चव्हाण यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून संस्थेचे व सोलापूर शहराचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल गौरव व्यक्त केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे, उपप्राचार्य (करिअर डेव्हलपमेंट) डॉ. श्रीनिवास एस. मेतन, तसेच उपप्राचार्य (अकॅडमिक्स) डॉ. व्ही. के. पतकी यांनी विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, डीन, प्राध्यापक व कर्मचारीवर्ग यांनीही विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्था व देशाचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास व्यक्त केला. ही कामगिरी सोलापूर शहरातील अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रासाठी “मानाचा तुरा” ठरली असून एनके ऑर्किड कॉलेजची जागतिक पातळीवरील वाढती ओळख आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्याची कटिबद्धता अधोरेखित करते.

“सोलापूरसारख्या टियर-२ शहरातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचा संशोधन व तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. आयएसएई सुपमेका, फ्रान्स येथे मिळालेली ही पूर्णतः प्रायोजित इंटर्नशिप विद्यार्थिनींसाठी आणि सोलापूरसाठी अभिमानाची बाब आहे. ड्रोन तंत्रज्ञान, GNC, इंडस्ट्री 5.0 आणि मेकॅट्रॉनिक्स या अत्याधुनिक क्षेत्रांत काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषी दृष्टीकोन आणि जागतिक स्तरावरील तयारी निर्माण होईल. एनके ऑर्किड कॉलेज भविष्यातही अशा आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.” – डॉ. श्रीनिवास एस. मेतन,उपप्राचार्य (करिअर डेव्हलपमेंट) व प्रोजेक्ट मेंटर

विद्यार्थिनीचे मनोगत :
पॅरिस येथील आयएसएई सुपमेका येथे पाच महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपसाठी निवड होणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या संधीमुळे मला जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान, संशोधन पद्धती आणि व्यावसायिक कार्य संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. या यशामागे महाविद्यालयाचे शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि पाठबळ मोलाचे आहे. या संधीचा सर्वोत्तम उपयोग करून माझी कौशल्ये अधिक विकसित करणे आणि देशाचे नाव उज्ज्वल करणे हा माझा निर्धार आहे. या आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे maza आत्मविश्वास वाढेल आणि उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया तयार होईल, असा विश्वास आहे. – स्नेहल शिंदे (विद्यार्थिनी)

मला अत्यंत आनंदाने कळवायचे आहे की माझी आयएसएई सुपमेका पॅरिस (फ्रान्स) येथे ४ महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. ही इंटर्नशिप “मेकॅट्रॉनिक्स मॉडेलिंग ऑफ इंटायर इंडस्ट्री 5.0” या प्रगत प्रकल्पासाठी असून इंडस्ट्री 5.0 सारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद यश आहे. हा माझ्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या यशामागे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची सततचे मार्गदर्शन, पाठबळ आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या कुटुंबीयांचे, प्राध्यापकांचे आणि मार्गदर्शकांचे मी मनःपूर्वक आभार मानते. पॅरिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान आहे आणि या इंटर्नशिपमधून नवीन ज्ञान व कौशल्ये आत्मसात करण्यासाठी मी उत्सुक आहे. – समीक्षा सत्रे (विद्यार्थिनी)

Previous Post

TOP 25 – सोलापूर महापालिकेतील बेशिस्त पार्किंगला लागेल शिस्त…!

Next Post

असावा प्रशालेचा 64 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
असावा प्रशालेचा 64 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

असावा प्रशालेचा 64 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026