• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वादामुळे ‘पद्मशाली ज्ञाती’ची विश्वस्त, अध्यक्ष निवड लांबणीवर!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 29, 2025
in इतर घडामोडी
0
वादामुळे ‘पद्मशाली ज्ञाती’ची विश्वस्त, अध्यक्ष निवड लांबणीवर!
0
SHARES
0
VIEWS

सहा महिन्यात मतदान पद्धतीने निवड प्रक्रिया करण्याचा सर्वसाधारण सभेत ठराव
सोलापूर : येथील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या नूतन विश्वस्त व अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वादामुळे होऊ शकली नाही. निवडीची प्रक्रिया पुढील सहा महिन्यात मतदान पद्धतीने करण्याचा ठराव गोंधळातच करीत ही सभा आटोपण्यात आली.

संस्थेची 73 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ज्येष्ठ नेते सत्यनारायण बोल्ली, अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, ज्ञाती संस्थेचे विश्वस्त रामकृष्ण कोंड्याल, रामचंद्र जन्नू, नरसप्पा इप्पाकायल, मुरलीधर अरकाल, जनार्दन कारमपुरी, सचिव संतोष सोमा आदी व्यासपीठावर होते. सभेच्या कामकाजास सकाळी साडेदहा वाजता सुरुवात करण्यात आली मात्र कोरम नसल्याने सभा अर्ध्या तासासाठी करण्यात आली. त्यानंतर अकरा वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.

प्रारंभी वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर उत्पन्न खर्च पत्रक, ताळेबंद पत्रक, सन 2025-26 च्या अंदाजपत्रकाला मंजुरीची प्रक्रिया पार पडली. या विषयांशिवाय सभेच्या अजेंड्यावर नूतन पाच विश्वस्त तसेच अध्यक्ष निवडणे आदी विषयदेखील होते. यापैकी विश्वस्त निवडीचा विषयावर कामकाज सुरू झाल्यावर सभेत एकमत न झाल्याने वाद निर्माण झाला. या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न ज्येष्ठ मंडळींकडून करण्यात आला, मात्र कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने गोंधळ वाढतच गेला. विश्वस्त निवडीचा पेच सुटला नसताना याच गोंधळात सभासदांनी अध्यक्ष निवडीबाबत बोलण्यास सुरुवात केली. अशोक इंदापुरे, दयानंद कोंडाबत्तीनी, व्यंकटेश कोंडी, नागेश सरगम आदी सभासदांनी अध्यक्षपदी पुन्हा सुरेश फलमारी यांना संधी देऊ नये, अशी आग्रही मागणी केली. अध्यक्षपदासाठी अशोक इंदापुरे, संतोष सोमा आदी मंडळी इच्छुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अध्यक्ष निवडीबाबत तोडगा करण्याचा प्रयत्न ज्येष्ठ नेते सत्यनारायण बोल्ली यांनी केला.

अध्यक्षपदी पुन्हा फलमारी यांना संधी द्यायचा विचार आहे, फलमारीविरोधी गटाला सचिवपद देऊ, असा प्रस्ताव बोल्ली यांनी मांडला, मात्र तो फलमारी विरोधकांना मान्य नव्हता. अशोक इंदापुरे, नागेश सरगम आदींची मनधरणी करण्याचा प्रयत्न बोल्ली यांनी केला, मात्र त्यास यश आले नाही.
अध्यक्ष निवडीबाबत एकमत होत नसल्याने अखेर बोल्ली यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी सभात्याग केला.

या गोंधळाच्या वातावरणातच काही सभासदांनी निवडीचा वाद मिटेपर्यंत सत्यनारायण बोल्ली, हरिदास पोटाबत्ती प्रकाश जन्नू, श्रीनिवास क्यातम, श्रीनिवास संगा यांची पंच कमिटी नियुक्त करून मार्कंडेय रथोत्सव समिती नेमण्याबाबत सुचविले, मात्र त्यावर एकमत झाले नाही. शेवटी अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी येत्या सहा महिन्यात नूतन विश्वस्त, अध्यक्ष निवडीची प्रक्रिया मतदान पद्धतीने घेण्यात यावी, असा प्रस्ताव सभेपुढे मांडला. सभेने त्याला मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले.

…. तोपर्यंत विद्यमान पदाधिकारीच काम पाहणार : फलमारी

पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये विश्वस्त तसेच अध्यक्ष निवडीची प्रक्रिया वादामुळे होऊ शकली नाही. त्यामुळे सभासदांच्या प्रस्तावानुसार निवडीची प्रक्रिया येत्या सहा महिन्यात मतदान पद्धतीने पार पाडण्याचा ठराव सभेत करण्यात आला. यानुसार नूतन विश्वस्त, अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडेपर्यंत संस्थेचे विद्यमान पदाधिकारीच संस्थेचे कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी दिली.

Previous Post

प्रशांत गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने गजानन महाराज पालखी सोहळ्यतील वारकरी व भाविकांना केळी वाटप…

Next Post

वारकरी कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी चार्जिंगची सोय

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
वारकरी कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी चार्जिंगची सोय

वारकरी कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी चार्जिंगची सोय

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026