• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आणीबाणी काळातील घटनांना उजाळा – निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 25, 2025
in इतर घडामोडी
0
चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आणीबाणी काळातील घटनांना उजाळा – निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – देशात दिनांक 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज दिनांक 25 जून रोजी 50 वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हास्तरावर त्या काळातील घडामोडी बाबत तसेच सक्षम लोकशाहीच्या अनुषंगाने चित्र प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणीबाणीच्या काळातील घटनांना उजाळा मिळणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशात आणीबाणी जाहीर जाहीर केल्याच्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी निऱ्हाळी मार्गदर्शन करत होते. यावेळी आणीबाणी विरोधात लढा दिलेल्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी असलेले गुरुराज कुलकर्णी, किशोर देशपांडे, अनंत दाते, शिरीष कुलकर्णी, सुधारकर कुलकर्णी, बाळासाहेब राऊत, संभाजी आदट, विलास पोरे, रामचंद्र तडवळकर, तसेच सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रोहिणी तडवळकर, जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी निऱ्हाळी पुढे म्हणाले की, देशातील सन 1975 ते 1977 मधील आणी बाणीच्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणीबाणीचा इतिहास चित्रफीत व चित्रप्रदर्शनातून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी मध्यवर्ती इमारतीमध्ये हे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदेशाला भेट देऊन आणीबाणीच्या घटनांचे विविध पैलू जाणून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गुरुराज कुलकर्णी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “भारत माता की जय” व “भारतीय लोकशाही अमर रहे” या घोषणा देऊन केली. देशाची लोकशाही चिरतरुण रहावी यासाठी आणीबाणीच्या कालावधीत त्या विरोधात संघर्ष उभा करण्यात आला. आणीबाणीच्या घटनेने राज्यघटनेची पायमल्ली होऊन लोकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्यात आली. आणीबाणी विरोधात संघर्ष करणाऱ्या लोकांना बंदीवास भोगावा लागला व त्यांच्या कुटुंबीयांचे खूप हाल झाले. त्याकाळी देश सेवेने प्रेरित झालेल्या लोकांनी लोकशाही संरक्षणासाठी जो लढा निर्माण केला आज त्या लोकांचा योग्य सन्मान शासन करत असल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले.
किशोर देशपांडे म्हणाले, देशात आणीबाणी लागू करण्यात आलेल्या घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. देशात आणीबाणी लागू झाली याचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील देशसेवेने प्रेरित तरुणांनी भितीपत्रके, पत्रके, समाजजागृतीसाठी वाटली. या लोकांना कारावास भोगावा लागला. यावेळी त्यांनी आणीबाणीच्या विरोधात केलेल्या विविध घटनांची माहिती सविस्तरपणे दिली. जिल्ह्यातून लढा उभा करणाऱ्या लोकांचा आज शासनाच्या वतीने सन्मान होत आहे, याविषयी त्यांनी अभिमान व्यक्त केला.
सामाजिक कार्यकत्या श्रीमती रोहिणी पडळकर यांनी लोकशाही वाचविण्यासाठी जिल्ह्यातील ज्या लोकांनी लढा दिला त्यांचा आयोजित चित्रप्रदर्शनातून आणीबाणी काळात झालेल्या घटनांचा ऊहापोह होणार असल्याचे नमूद केले.
प्रारंभी या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, किशोर देशपांडे, गिरीराज कुलकर्णी व अन्य सर्व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमास उपस्थित आणीबाणी कालावधीत बंदीवास भोगलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी या कार्यक्रमाचा आयोजनाचा उद्देश सांगितला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तहसीलदार शिल्पा ओसवाल यांनी मानले.

 या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने देशात व सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या विविध घटना-घडामोडींची तसेच आणीबाणीविरोधी संघर्षात सहभागी झालेल्या विविध कार्यकर्ते- नागरिकांची नावे छायाचित्रे समाविष्ट आहेत.  या प्रदर्शनातून आणीबाणीच्या कालावधीतील संपूर्ण संघर्ष आणि त्याचे विविध पैलू सर्वसामान्य नागरिकासमोर मांडले जात आहेत. हे प्रदर्शन जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीमध्ये दिनांक 25 जून ते 24 जुलै 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.25 वाजता या कालावधीत सर्वांसाठी विनामूल्य सुरू राहणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Previous Post

‘शांभवी चषक 2025’ चे थाटात उदघाटन

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रतीक उग्राल यास भारत सरकारचे रु. दोन लाखांचे पारितोषिक

Related Posts

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रतीक उग्राल यास भारत सरकारचे रु. दोन लाखांचे पारितोषिक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रतीक उग्राल यास भारत सरकारचे रु. दोन लाखांचे पारितोषिक

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026