• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंत्रिमंडळ बैठक आज संपन्न… 10 मोठे निर्णय…शेतीसाठी AI धोरण मंजूर…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 17, 2025
in इतर घडामोडी
0
मंत्रिमंडळ बैठक आज संपन्न… 10 मोठे निर्णय…शेतीसाठी AI धोरण मंजूर…
0
SHARES
1
VIEWS

मंत्रिमंडळाचे 10 महत्त्वाचे निर्णय

१) ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मौजे जांबुटके येथील २९ हेक्टर ५२ आर जमीन. आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन, रोजगार निर्मिती व आर्थिक विकासास चालना मिळणार. (महसूल विभाग)

२) एमएमआरडीए आणि मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटर लि. यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत. सार्वजनिक, खासगी भागिदारीतून हा राज्यातील पहिलाचा मोठा प्रकल्प. ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार. (महसूल विभाग)

३) मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ. विद्यापीठाला स्व-मालकीची इमारत मिळणार. हजारो विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार. (महसूल विभाग)

४) धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी (SPV) आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ. लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने, पुनवर्सन व पुनर्विकास योजनेला गती लाभणार. योजनेची अंमलबजावणी सुलभ रीतीने होणार. (महसूल विभाग)

५) केंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची (AWS- Automatic Weather Station) उभारणी करण्यात येणार. यासाठी महावेध प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय. राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठीचा प्रकल्प. शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषि विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी महत्वाचा प्रकल्प. (कृषि विभाग)

६) महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर. कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडविता येणार. कृत्रिम बुद्धीमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स, पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत, राज्यातील ॲग्रीस्टॅक, महा-ॲग्रीस्टेक, महावेद, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार. (कृषि विभाग)

७) मुंबई मेट्रो मार्ग-२अ, २ ब आणि ७ या मेट्रो प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ. (नगरविकास विभाग)

८) विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता “बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा” या तत्त्वावर हाती घेण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग).

९) आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ. ह्यात जोडीदारालाही मानधन मिळणार. गौरव योजनेमध्ये सुधारणा. (सामान्य प्रशासन विभाग).

१०) अनिवासी भारतीयांच्या मुलांना, पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार. विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल. प्रवेश व शुल्क यांचे विनियमन अधिनियम, २०१५ मध्ये सुधारणा. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

Previous Post

वालचंदच्या ७७ विद्यार्थ्यांचे CET-PCM गटात घवघवीत यश

Next Post

सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव…

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव…

सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव…

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026