• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यातील 88 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीनचे 80 कोटीचे अग्रीम जमा

Yes News Marathi by Yes News Marathi
November 16, 2023
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यातील 88 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीनचे 80 कोटीचे अग्रीम जमा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि.16 (जिमाका):- प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पीकविमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका व बाजरी पीकांसाठी पात्र विमाधारक शेतक-यांना 25 टक्के नुकसान भरपाई रक्कम नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यापासून वितरीत केले जाणार होते. परंतु विमा कंपनीने सोयाबीन अग्रीमाबाबत विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केले होते. त्या अपिलाच्या सुनावणीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीचे सर्व मुद्दे खोडून काढल्याने विमा कंपनीने जिल्ह्यातील सोयाबीन पीक विम्याच्या 1 लाख 16 हजार 173 अर्ज भरणाऱ्या 88 हजार 352 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट 80 कोटी 78 लाख रुपये दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी जमा केल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत सोलापूर जिल्हयात माहे ऑगस्टमध्ये पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता लक्षात घेता प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत जिल्ह्यातील 92 महसूल मंडळे व 8 तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम देणेबाबत पिक विमा कंपनीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हास्तरवर झालेल्या सात ते आठ बैठकांमध्ये तसेच लेखी पत्राद्वारे वांरवार सूचना देऊन तसेच अपर मुख्य सचिव कृषि विभाग, आयुक्त कृषि महाराष्ट्र राज्य यांचेशी दुरध्वनीद्वारे तसेच कृषि मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सोलापूर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली.

त्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाठपुरावा केला. तर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पिक विमा अग्रीमबाबत पाठपुरावाही केलेला होता. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी ही पीक विमा अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शासन व विमा कंपनीकडे पाठपुरावा करत होते.

जिल्हा प्रशासन व सर्व लोकप्रतिनिधी यांनी विमा कंपनीकडे केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन विमा कंपनीने सोयाबीन, बाजरी व मका पिकासाठी आगाऊ रक्कम मंजूर केली. परंतु विमा कंपनीने सोयाबीन अग्रीम बाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्या अपीलावर विभागीय आयुक्त यांनी सुनावणी घेतली त्या सुनावणी मध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीचे सर्व मुद्दे खोडून काढल्याने विमा कंपनीने दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी 88 हजार 352 लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर 80 कोटी 78 लाख रुपये सोयाबीन नुकसान भरपाई अग्रीम जमा केलेले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीनचे अग्रीम रक्कम जमा झाल्याची माहिती गावसाने यांनी दिली.

Tags: bank accountsdepositFarmerssoybeans
Previous Post

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 15 दिवसाचे कुक्कुट पालन प्रशिक्षणासाठी अर्ज करावेत

Next Post

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत 22 नोव्हेंबर रोजी मेळाव्यावे आयोजन

Related Posts

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम
इतर घडामोडी

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!
इतर घडामोडी

महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा
इतर घडामोडी

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
इतर घडामोडी

आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

August 6, 2026
Next Post
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत 22 नोव्हेंबर रोजी मेळाव्यावे आयोजन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत 22 नोव्हेंबर रोजी मेळाव्यावे आयोजन

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026