सोलापूर- प्रिसिजनने तयार केलेल्या रेट्रोफीटेड ईलेक्ट्रिक बसचे सादरीकरण करण्यात आले.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.अशा प्रकारची बस भारतात बनणे आणी त्याची सुरवात सोलापूर मधून होणे ही अभिमानाची तर गोष्ट आहेच परंतु सोलापूरची एक नवीन ओळख प्रिसिजनच्या ह्या बसमुळे जगात होईल. प्रिसिजनचे कार्यकारी संचालक करण शहा यांनी यात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी अभिनंदन ही केले.त्यानंतर सोलापूर महापालिका आयुक्त यांनी ईलेक्ट्रिक वाहनांसंबंधी नागरिकांमध्ये जनजगृती होणे आवश्यक आहे.प्रिसिजन कंपनीने या विषयात अग्रेसर होऊन असा प्रकारची जनजगृती करावी.भविष्यात सोलापूर शहरातील सिटी बस साठी ही काही न काही उपयोजना करून सोलापूरकरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी हातभार लावावा असे मत व्यक्त त्यांनी केले.
प्रारंभी भारतातील पहिल्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसच्या सादरीकरण वेळी करण शहा बोलत होते.या कार्यक्रमचे प्रास्ताविक आणि या बस बद्दलची संपूर्ण माहिती व सादरीकरण करताना ईमॉस या कंपनीचा इतिहास त्यानंतर प्रिसिजन ने केलेल टेकओव्हर आणि आत या कंपनीची झालेली प्रगती या विषयी संपूर्ण माहिती त्यांनी दिली.
प्रिसिजनची इलेक्ट्रिक बस ही पर्यावरण पूरक असून ही एक फक्त सार्वजनिक व्यवस्था नसून पर्यावरण वाचविण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न असेल व आपण ही बस तयार करून पर्यावरणाला आणखी जवळ केलात तसेच या बसला स्पीड लिमिट असल्याने ट्राफिक च्या नियमांचे आपोआपच पालन केले जाईल असे मत पोलीस उपायुक्त सौ दिपाली धाटे यांनी आपल्या मनोगतात आपल्या भावना व्यक्त केल्या.सोलापूर मध्ये ही इलेक्ट्रिक बस तयार होत आहे याचा सार्थ अभिमान वाटतो असे मत आरटीओ चे अधिकारी महेश रायबाण यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले.सादरीकरनां नंतर प्रिसिजनचे चेअरमन यतीन शहा यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. प्रिसिजन भविष्यात लाईट commerical vehical च्या निर्मिती मध्ये पदार्पण करीत आहे त्यासाठी आपल्या सर्वांचे व सोलापूकरांचे सहकार्य अपेक्षित आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याआधी या सर्व मान्यवरांची या बस मध्ये रंगभवन सात रस्ता डफरिन चौक अशी एक राईड झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी केले.