सोलापूर : ज्येष्ठ नगरसेवक. प्राध्यापक पुरणचंद्र पुंजाल वय 82 यांचे आज मंगळवारी सकाळी सहा वाजता पद्मा नगर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झालं. पुंजाल हे हिराचंद नेमचंद महाविद्यालयामध्ये फिजिकल डायरेक्टर म्हणून अनेक वर्ष सेवेत होते. 1975 साली प्रथम ते सोलापूर महानगरपालिकेवर निवडून आले.यानंतर 1975, 1985, 1992, 2002, 2012, असे पाच वेळा ते निवडून आले. 1997 आणि 20 12 असा दोन वेळा त्यांचा पराभवही झाला होता. स्थायी समिती सभापती पद याचबरोबर 1980 ची सत्ता पालिकेत असताना ते महापौर म्हणून निवडून आले.
पुंजाल यांनी आपल्या कारकिर्दीत पालिकेच्या माध्यमातून अनेक विकासात्मक काम केली त्याचं नाव आजही घेतलं जातं. मार्कंडेय जलतरण तलाव गणेश पेठ शॉपिंग सेंटर शुभराय आर्ट गॅलरी, पार्क स्टेडियम सुधारणा अशा कामांचा समावेश आहे. सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे ते अनेक वर्ष पदाधिकारी होते याशिवाय विविध क्रीडा संस्थांशी त्यांचा मार्गदर्शक म्हणून संपर्क होता. बुधवार बाजार भारतीय चौक नवरात्र महोत्सव मंडळाचे ते अनेक वर्ष संस्थापक सदस्य आहेत. शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित प्राध्यापक पुंजाल यांनी आपल्या कारकिर्दीत सोलापुरात मिनी ओलंपिक भरवले. यासाठी मोठ्या प्रमाणावर खेळाडू सोलापुरात आले होते. अलीकडेच अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठांना त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं होतं. सोलापूरच्या सहकार क्षेत्रातील लक्ष्मी सहकारी बँकेचे ते संचालक आणि चेअरमन होते. शिक्षण क्षेत्रातील सेवानिवृत्ती याचबरोबर राजकारणातील ही सेवानिवृत्ती त्यांनी अलीकडच्या काळामध्ये घेतली होती. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शरद पवार यांचे जवळचे सहकारी आणि निष्ठावंत म्हणून त्यांची राजकीय क्षेत्रात ओळख होती. त्यांनी अनेक वर्ष काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबरोबर काम केलं.
सोलापूरच्या अश्विनी सहकारी रुग्णालयावर ते अनेक वर्ष संचालक होते याचबरोबर त्यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेत पदाधिकारी पद्मशाली न्याती संस्थेत पदाधिकारी म्हणून काम केलं आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व सभांमध्ये प्रशासनाच्या आणि विरोधकांच्या कार्यवाहीबद्दल स्पष्ट शब्दात चिरफाड असे.
प्राध्यापक पुंजाल यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली जावई नातवंड असा परिवार आहे.