देशमुख यांचा वसुबारसाच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल
महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी सलग पाचव्यांदा शहर उत्तर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस चा मुहूर्त साधत दाखल केला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार,सरचिटणीस रोहिणी तडवळकर,चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक नागेश भोगडे दत्ता बडगु यांची उपस्थिती होती.
सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासूनच राजवाडे चौकातील आमदार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाजवळ भाजप, राष्ट्रवादी, सेना, आरपीआय महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्ते एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. आमदार विजयकुमार देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज, काळजापुर मारुती,आजोबा गणपतींचे दर्शन घेत कार्यालयाकडे येऊन कार्यकर्त्यांना येणारे वीस दिवस पक्षासाठी देण्यासाठी आवाहन केले.
संपूर्ण राज्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाची लाट आली असून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.विरोधी पक्षातील उमेदवारांवर राजकीय ताळतंत्रच उरला नाही. चार वेळा पक्ष बदललं तीन वेळा मतदार संघ बदलले स्वतःच्या मतदारसंघाची इज्जत वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांच्या पायाखाली वाहिली. स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलले,कुटुंबाच्या स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरले. जनतेने हे आता ओळखले आहेत. चाळीस वर्षापासून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा गड राहिलेला आहे. विरोधकांच्या भूलताफेला शहर उत्तर मतदार संघातील मतदार कधीही बळी पडणार नाहीत. भाजपचा उमेदवार युती असताना आणि स्वतंत्र लढल्यावर सुद्धा जनता कायम पाठीशी राहिली.येणाऱ्या २० दिवस पक्षाला पूर्ण वेळ देऊन विरोधकांची टाळतंत्र नसलेल्या तोंडावर लगाम घालण्याचे आवाहन यावेळी आमदार देशमुख यांनी केलं.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे, राष्ट्रवादीचे आनंद चंदनशिवे, संजय कोळी,पिंटू ढावरे, सुहास कदम, ज्ञानेश्वर कारभारी, इंदिरा कुडक्याल, विजया वड्डेपल्ली, शिवानंद पाटील ,नारायण बनसोडे, अविनाश पाटील,आनंद तानवडे,बसलिंगप्पा खेडगी,मल्लिकार्जुन दारफळे, इरेश बागेवाडी, प्रवीण कांबळे, सुभाष पवार,पंकज काटकर, रवी कोटमळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते….
डॉक्टर किरण देशमुख यांनी भरला अर्ज
माजी नगरसेवक युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक नागेश भोगडे, दत्ता बडगु, सिद्धार्थ मंजेली, सुमित बिराजदार,राहुल शाबादे, सचिन लकडे यांच्या उपस्थिती होती….