अक्कलकोट : मतदारसंघातून स्वामी समर्थ, ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराज यांचे आशिर्वाद घेऊन सचिन कल्याणशेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. प्रमोदजी सावंत यांच्या मार्गदर्शनात आणि प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला यावेळी भाजप-महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महायुतीच्या भव्य नामांकन रॅली करत हजारो अक्कलकोट वासियांच्या उपस्थितीत भव्य रॅली अक्कलकोट मध्ये काढण्यात आली.
भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी पुन्हा एकदा अक्कलकोटच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल सचिन कल्याण शेट्टी यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅलीत हजारोंच्या संख्येने आलेल्या जनतेची उपस्थिती म्हणजे सचिन कल्याण शेट्टी यांना पाठिंबा देणारी विलक्षण गर्दी होती.