सोलापूर : मोहोळ शहर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हॉलीबॉल स्पर्धाचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.धवल दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील युवा होतकरू खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करून द्यावे. असे प्रतिपादन हत्तुरे यांनी केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील, काँग्रेसचे नेते नामदेव फुलारी,तालुकाध्यक्ष सुरेश आप्पा शिवपुजे, शहराध्यक्ष किशोर राजे पवार, बीरासाहेब खरात, अमोल मोरे, शाहीर काळे, दाजी कोकाटे, बाळासाहेब जाधव, नागेश पवार, संतोष चव्हाण, माऊली गायकवाड, दादासाहेब गायकवाड, हनुमंत खांडेकर, हनुमंतू पाटीलआदींसह मोहोळ तालुका काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत बारा संघाने सहभाग घेतला आहे. उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. युवा खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संयोजक किशोर राजे पवार यांनी मानले.
