सोलापूर -: कै. मुरलीधर घाडगे पैलवान यांच्या 33 व्या पुण्यतिथीनिमित्त पत्रा तालीम येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी कोविडच्या नियमांचे पालन करीत 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. राज्यभर कोविडमुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी पत्रा तालीम मंडळाने रक्तदान शिबिर घेवून आपली सामाजिकता जोपासली. या रक्तदान शिबिरावेळी स्थायी समितीचे माजी सभापती नाना काळे,श्रीकांत घाडगे, श्रीराम घाडगे, मनोज गादेकर, बिज्जु प्रधाने, सतीश कोलारकर, उमाकांत घाडगे, विद्याचंद्र भुरले, बजरंग जाधव, श्रीकांत हुलगे, गणेश शेळके, पवन पाटील, सचिन शिंदे, उत्तम कोलारकर, अशोक शिंदे, चंद्रशेखर सुरवसे, कपिल पवार, विजू पाल्कुतवार, किशोर गादेकर, निशांत सावले, जलपेश घुले, माउली भोजरंगे आदी उपस्थित होते.

