सोलापूर : सोरेगाव येथील शेतातून १६,००० रुपये किमतीचे चार मोठे नांगर तीन छोटे नांगर व ट्रॅक्टर चे रोटावेटर सॉफ्ट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही अवजारे शशिकांत प्रकाश यलगुलवार यांच्या शेतातून चोरीस गेल्याचे मदप्पा अमोगसिद्ध म्हेत्रे (राहणार : माळी गल्ली सोरेगाव) यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

