• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘प्रिसिजन’च्या पुढाकाराने मोदी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी कार्यान्वित

Yes News Marathi by Yes News Marathi
May 19, 2021
in मुख्य बातमी
0
‘प्रिसिजन’च्या पुढाकाराने मोदी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी कार्यान्वित
0
SHARES
1
VIEWS

‘प्रिसिजन’च्या सीएसआर निधीतून सुशोभीकरणाचंही काम पूर्ण, सोलापूर महापालिकेकडे हस्तांतरण

सोलापूर : प्रिसिजन समूहाच्या पुढाकारातून मोदी स्मशानभूमीतील बंद असणारी पहिली विद्युतदाहिनी बुधवारी (दि. १९) कार्यान्वित झाली. प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन यतिन शहा यांनी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्याकडे आज याबाबतचं हस्तांतरण पत्र सुपूर्द केलं.


कोरोना महामारीमुळे सोलापूरात मृतांची संख्या वाढत असून फूटाफूटाच्या अंतरावर चिता रचाव्या लागत आहेत. इतकंच नव्हे तर अनेक मृतदेह वेटिंगवर ठेवावे लागत आहेत. ही वस्तुस्थिती सोलापूरातील माध्यमांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मांडली होती. या पार्श्वभूमीवर मोदी स्मशानभूमीतील पहिली विद्युतदाहिनी तत्काळ सुरू व्हावी असं आवाहन उपायुक्त पांडे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने केलं होतं. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने पुढाकार घेत प्रिसिजन समूहाने आपल्या सीएसआर निधीतून ही विद्युतदाहिनी कार्यान्वित केली आहे.

विद्युतदाहिनीमध्ये नव्या कॉईल्स व नवा ब्लोअर बसविण्यात आला आहे. ट्रॉन्सफॉर्मरचीही दुरूस्ती करण्यात आली आहे. श्रद्धांजली सभागृहासह संपूर्ण स्मशानभूमीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी नवे लाईट्स बसविण्यात आले आहेत. प्रवेशद्वारासमोरील पटांगणात चाफ्याची झाडं लावून सुशोभीकरण करण्यात आलं आहे. अस्थी गोळा करण्यासाठी कुंड्या ठेवण्यात आल्या असून आवश्यक ते माहितीफलकही लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रिसिजनच्या टीमने अत्यंत वेगाने काम करत अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत हे नूतनीकरण पूर्ण केलं. यासाठी यतिन शहा यांनी स्वतः वारंवार मोदी स्मशानभूमीला भेट देऊन कामाचा आढावा घेतला होता.

या योगदानाबद्दल उपायुक्त पांडे यांनी प्रिसिजन समूहाचे आभार मानले. नूतनीकृत मोदी स्मशानभूमीचं पावित्र्य जपण्यासाठी सोलापूरकरांनीही महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं.

या हस्तांतरणावेळी प्रिसिजनचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप महिंद्रकर व सिद्धेश्वर चंदनशिवे, जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे व आदित्य गाडगीळ, मोहसीन अत्तार, अस्लम कलादगी तसेच सोलापूर महानगरपालिकेचे झोनल ऑफिसर विजयकुमार लोखंडे, विद्युत विभागाचे राजेश परदेशी व परवेज शेख, मुख्य आरोग्य निरीक्षक सुधाकर नागटिळक यांच्यासह आरोग्य विभागाचे पूनम कांबळे, श्रीशैल हिंगमिरे, राजू डोलारे हे उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरातील कोरोना वाढीचा वेग मंदावला

Next Post

सोलापूर जिल्ह्यात नव्याने २०९९ व्यक्तींना कोरोना । २३ जणांचा मृत्यू

Related Posts

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात नव्याने २०९९ व्यक्तींना कोरोना । २३ जणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात नव्याने २०९९ व्यक्तींना कोरोना । २३ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026