• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महिला, सर्वसाधारण हॉस्पिटलच्या कामास आवश्यक निधी देऊ – पालकमंत्री

Yes News Marathi by Yes News Marathi
April 30, 2021
in मुख्य बातमी
0
महिला, सर्वसाधारण हॉस्पिटलच्या कामास आवश्यक निधी देऊ – पालकमंत्री
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. ३० : सोलापुरातील महिला हॉस्पिटल आणि सर्वसाधारण हॉस्पिटलच्या कामांस गती द्या. त्यासाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करुन देऊ, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितले.

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भरणे यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लसीकरण समन्वयक डॉ अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे यांनी सुरुवातीला शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. त्याचबरोबर सोलापुरातील गुरुनानक चौकात उभारण्यात येत असलेल्या महिला हॉस्पिटल आणि सर्वसाधारण हॉस्पिटलच्या कामाचा आढावा घेतला. या दोन्ही हॉस्पिटलच्या उभारणीच्या कामास गती द्यावी. त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देऊ, असे भरणे यांनी सांगितले. आणखी लागणाऱ्या निधीबाबत सविस्तर प्रस्ताव तत्काळ तयार करून द्यावा, अशी सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे यांना केली.

करमाळा, पंढरपूर, माळशिरस आणि माढा या तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या तालुक्यातील निर्बंध काटेकोर करावेत. गर्दी होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी. कोरोनाच्या चाचण्या आणि संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढवाव्यात, असे श्री. भरणे यांनी सांगितले.

खासगी कोविड केअर सेंटरला परवानगी देण्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

ग्रामीण भागातील विविध गावात सुरु करण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवा, अशा सूचना त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिल्या. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी नियोजन करा. राज्य शासनाकडून जास्तीत जास्त लस मिळवण्यासाठी प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले.

अठरा ते ४४ वयोगटातील लोकांना उद्या प्रातिनिधिक स्वरूपात शहरात एका तर ग्रामीण भागात चार ठिकाणी लस दिली जाणार आहे, असे डॉ. पिंपळे यांनी सांगितले.

बैठकीस उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, अनिल कारंडे, सुप्रिया डांगे, परिवहन अधिकारी सतीश जाधव, अर्चना गायकवाड, शिक्षणाधिकारी संजय राठोड, भास्करराव बाबर, जावेद शेख आयएमएचे निनाद शहा आदी उपस्थित होते.

Previous Post

उजनीचे पाणी पळवल्यास जनआंदोलन करणार – आ. सुभाष देशमुख

Next Post

सोलापूर जिल्ह्यात नवीन २१४७ व्यक्तींना कोरोनाची बाधा

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात नवीन २१४७ व्यक्तींना कोरोनाची बाधा

सोलापूर जिल्ह्यात नवीन २१४७ व्यक्तींना कोरोनाची बाधा

ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026