• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात महाराजस्व अभियानात 77 हजार 206 विविध दाखल्यांचे वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
May 23, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यात महाराजस्व अभियानात 77 हजार 206 विविध दाखल्यांचे वाटप
0
SHARES
1
VIEWS



जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकारातून
126 महसुली मंडळापैकी 76 मंडळात समाधान शिबिरांचे आयोजन, उर्वरित मंडळातही शिबिरे प्रस्तावित
एक ही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी दाखल्या अभावी शैक्षणिक प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने गतिमान पद्धतीने शिबिरांचे आयोजन


सोलापूर,दिनांक- 22(जिमाका):- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विविध शासकीय योजना यांच्यासाठी लागणारे प्रमाणपत्र वाटप जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या महसुली मंडळात शिबिराच्या माध्यमातून करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सर्व संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना दिलेले होते. त्या अनुषंगाने दिनांक 25 मार्च 2025 पासून ते 21 मे 2025 पर्यंत 126 महसुली मंडळापैकी 76 महसुली मंडळात समाधान शिबिराचे आयोजन करून जातीचे दाखले, उत्पन्न, अधिवास, रहिवासी दाखले, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र व इतर दाखले असे एकूण 77 हजार 206 दाखल्यांचे वाटप करून विद्यार्थी व पालक यांची शैक्षणिक प्रवेशासाठी होणारी गैरसोय टाळण्यात प्रशासन यशस्वी होत आहे.


शैक्षणिक वर्ष सन 2025-26 ची सुरुवात माहे जून 2025 पासून होत आहे या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आवश्यक जातीचे दाखले, उत्पन्न अधिवास रहिवास दाखले तसेच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व अन्य दाखले हे सर्व विद्यार्थी व पालकांना वेळेत मिळावे यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली 11 तहसील कार्यालय व एक अप्पर तहसील कार्यालय यांच्या अंतर्गत असणाऱ्या 126 महसुली मंडळात समाधान शिबिरे आयोजन करून परिसरातील विद्यार्थी व पालकांना आपले वाटत केले जात आहेत. दिनांक 21 मे 2025 पर्यंत 76 शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले असून उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व पंचवीस मंडळात शिबिरे घेण्यात आलेली आहे, तर ज्या महसुली मंडळात अद्याप पर्यंत शिबिरे घेण्यात आलेली नाहीत त्या मंडळाने शिबिरांचे आयोजन करून दाखले वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले आहेत.


दिनांक एक मे 2025 ते 21 मे 2025 या कालावधीत महाराजस्व अभियाना अंतर्गत 2969 जातीचे दाखले, 18837 उत्पन्नाचे दाखले, 2279 आदिवासी दाखले, 2092 रहिवास दाखले, 2726 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र तर 2666 इतर दाखले असे एकूण 31 हजार 569 विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणेच दिनांक 25 मार्च 2025 पासून ते एप्रिल 2025 अखेरपर्यंत एकूण 45 हजार 637 विविध दाखले वाटप करण्यात आलेले आहेत तर आज रोजी पर्यंत 77 हजार 206 विविध शालेय दाखल्यांचे वाटप करून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


महसुली मंडळास्तरावरच विविध दाखले वाटपाचे शिबिरे घेण्यात येत असल्याने शालेय विद्यार्थी व पालक समाधानी असून याच पद्धतीने प्रत्येक वर्षी शिबिरांचे आयोजन करावे. यातून शिबिराच्या ठिकाणी विविध दाखले मिळत असल्याने पालकांचा वेळ तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खर्चाची बचत होत आहे. दाखले वेळेत मिळत असल्याने शैक्षणिक प्रवेशासाठी होणारी धावपळ कमी होत आहे.
दिनांक 25 मार्च 2025 ते आज रोजी पर्यंत 11 तहसील कार्यालय व एक अपर तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या शिबिरांची संख्या व वाटप केलेल्या दाखल्याची संख्या खालील प्रमाणे….


1.उत्तर सोलापूर तहसील कार्यालय 25 महसूल मंडळे, 25 शिबिरांचे आयोजन तर 17796 विविध शालेय दाखल्यांचे वाटप. 2.बार्शी तहसील कार्यालय, महसूल मंडळ 11, शिबिरे 9, आठ हजार 202 दाखल्यांचे वाटप. 3. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय, मंडळाची संख्या 4, शिबिरे 4, दाखले वाटप 1572. 4. अप्पर तहसील मंद्रूप -महसूल मंडळे 4, शिबिरे 4, दाखले वाटप 1746. 5. अक्कलकोट-महसूल मंडळे 10 शिबिरे-0, दाखले वाटप 3406, 6. माढा महसूल मंडळ 11, शिबिरे 0, दाखले वाटप 5385 तसेच 11 ठिकाणी शिबिरे प्रस्तावित आहेत. 7. करमाळा -महसूल मंडळे 11, शिबिरे 1, दाखले वाटप 6016. 8.पंढरपूर – महसूल मंडळे 11, शिबिरे 12, दाखले वाटप 6550. 9. मोहोळ – महसूल मंडळे 9, शिबिरे 9, दाखले वाटप 5025. 10.मंगळवेढा – महसूल मंडळे 8, शिबिरे 0, दाखले वाटप 5595. 11.सांगोला – महसूल मंडळ 10, शिबिरे 0, दाखले वाटप 7444 आणि 12. माळशिरस -महसूल मंडळे 12, शिबिरे 12, दाखले वाटप 8467.


“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 11 तहसील कार्यालय व एक अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत च्या 126 महसुली मंडळात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध दाखले व प्रमाणपत्राच्या वाटप करण्यासाठी दिनांक 25 मार्च 2025 पासून समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे आज रोजी पर्यंत 76 शिबिरांचे आयोजन झाले असून 77 हजार 206 विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. उर्वरित महसुली मंडळातही शिबिरे घेण्याचे प्रस्तावित आहे.


एक ही विद्यार्थी दाखल्या अभावी शैक्षणिक प्रवेशापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”
कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी, सोलापूर

Previous Post

अलिफ ओव्हरसीस एज्युकेशनच्या रशिया एमबीबीएस फेअरला प्रतिसाद

Next Post

डॉ. संतोष कदम यांच्या अर्थसंकल्पाविषयी सर्वकाही या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन…

Related Posts

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
Next Post
डॉ. संतोष कदम यांच्या अर्थसंकल्पाविषयी सर्वकाही या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन…

डॉ. संतोष कदम यांच्या अर्थसंकल्पाविषयी सर्वकाही या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन…

ताज्या बातम्या

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026