• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 9, 2026
in Blog
0
केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी
0
SHARES
0
VIEWS

उपळाई ठोंगे, पानगाव येथे सोयाबीन व तूर पिकांची पाहणी; साठवण तलाव कोरडा, ११ तालुके दुष्काळग्रस्त

केंद्रीय पथकाकडून पानगाव साठवण तलावाची पाहणी, जिल्ह्यात सध्या 108 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

सोलापूर : खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती आणि पीक नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने आज बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे व पानगाव येथे प्रत्यक्ष शेतपाहणी केली. पावसाअभावी जळालेली सोयाबीनची पिके, तूर पिकांची स्थिती आणि पानगाव येथील पूर्णपणे कोरडा पडलेला साठवण तलाव यांची पाहणी करून पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला.

केंद्रीय पथकाचे नेतृत्व कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोन्नुसामी करीत आहेत. पथकामध्ये पेयजल व स्वच्छता विभागाचे टीम लीडर अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहाय्यक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे हेदेखील पथकासोबत उपस्थित होते.

पावसाअभावी सोयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट

पानगाव येथे पथकाने पावसाअभावी जळून गेलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकरी आनंद धनंजय मोरे यांच्याशी संवाद साधून पिकांची स्थिती, शेतीसाठी झालेला खर्च आणि अपेक्षित उत्पन्न याबाबत माहिती घेतली. पाऊस चांगला झाला असता, तर सोयाबीनमधून हेक्टरी ५० ते ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असते; मात्र पावसाअभावी पीक पूर्णपणे नष्ट झाले असून, जळालेले सोयाबीन जनावरेही खात नसल्याचे मोरे यांनी पथकाला सांगितले.

पथकाने पानगाव येथील साठवण तलावाचीही पाहणी केली. तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याचे निदर्शनास आले. बार्शी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता यावरून स्पष्ट होत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने पथकाला देण्यात आली.

पिकांचा खर्च, भूजल पातळी आणि चारा व्यवस्थेची माहिती

उपळाई ठोंगे येथे श्रीमती लता शेळवणे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. त्यांचे बंधू कल्याण चव्हाण यांनी पथकाला पीक नुकसानीची माहिती दिली. चार एकर क्षेत्रात पीक घेण्यासाठी प्रति एकर २० ते २५ हजार रुपये खर्च झाला असून, पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.

पथकाने पेरणीपासून झालेला पाऊस, पावसातील खंड, पिकांची वाढ, गावातील एकूण पेरणी क्षेत्र, सोयाबीन व इतर पिकांचे क्षेत्र, आंतरपीक पद्धती तसेच भूजल पातळी याबाबत माहिती घेतली. जनावरांसाठी चारा उपलब्धतेची स्थिती जाणून घेत चारा डेपो सुरू करणे किंवा चारा छावण्या उभारणे यापैकी कोणता पर्याय अधिक उपयुक्त ठरेल, याबाबतही शेतकऱ्यांची मते विचारात घेतली. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

दोन ते तीन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करणार

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केंद्रीय पथकाला जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीची व्याप्ती आणि पाणीटंचाईबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून, सध्या १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पीक नुकसानीचे आतापर्यंत ६० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, पुढील दोन ते तीन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, तहसीलदार एफ. आर. शेख, मृद व जलसंधारण विभागाचे रामचंद्र क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी संतोष कोल्हे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात 138 गावे असून भौगोलिक क्षेत्र 1,50,316 हेक्टर व पेरणी क्षेत्र 1,36,546 हेक्टर आहे, सरासरी खरीप 73,177 हेक्टरच्या तुलनेत यंदा 1,01,056 हेक्टरवर पेरणी झाली असून सोयाबीन, तूर, उडीद ही प्रमुख पिके व द्राक्षे, कागदी लिंबू ही प्रमुख फळपिके आहेत, मात्र सरासरी 528.10 मिमी पावसाच्या तुलनेत केवळ 291.34 मिमी म्हणजे 44.83% तूट व 21 ते 44 दिवसांचा कोरडा काळ यामुळे सर्व 138 गावे व 1,12,226 हेक्टर क्षेत्र दुष्काळबाधित झाले असून 73,424 हेक्टरवर (65.42%) दुष्काळ नुकसानीची स्पॉट पाहणी पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमोर प्रशासनाने दिली

केंद्रीय पथक उद्या उत्तर सोलापूर, मंगळवेढा व सांगोला तालुक्यांतील दुष्काळी भागांची पाहणी करणार असून, प्रत्यक्ष निरीक्षणे आणि संबंधित विभागांकडून प्राप्त माहितीच्या आधारे केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे.

Previous Post

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

October 9, 2026
पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’
Blog

पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

October 8, 2026
उजनी धरणातून ठराविक तालुक्यासाठीच बेसुमार पाण्याचा उपसा…पाणीसाठा @85%
Blog

उजनी धरणातून ठराविक तालुक्यासाठीच बेसुमार पाण्याचा उपसा…पाणीसाठा @85%

October 8, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा
Blog

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

October 7, 2026
आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?
Blog

आषाढी वारीतील चष्मे घोटाळा दडपण्याचा प्रयत्न…?

October 7, 2026
मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी
Blog

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026