२२० व्यक्ती कोरोनामुक्त…
सोलापूर शहराचा १६ मे रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला असून ६९ व्यक्तींना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या २२० आहे. शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात सात व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. शहरातील प्रभागनिहाय बाधित रुग्णांचा आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक २३ मध्ये ११ तर प्रभाग क्रमांक २४ मध्ये नऊ, आणि प्रभाग क्रमांक २६ मध्ये १३ व्यक्तींना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. मृत्युमुखी पडलेल्या ७ जणांमध्ये आय.एम . एस. शाळेजवळ राहणाऱ्या चंद्रलोक नगर परिसरातील सतरा वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे.