• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

51 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; धाराशिव, सोलापूर, ठाणे व पुण्याची जोरदार कामगिरी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 5, 2025
in मुख्य बातमी
0
51 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; धाराशिव, सोलापूर, ठाणे व पुण्याची जोरदार कामगिरी
0
SHARES
13
VIEWS

मुलींच्या गटात रत्नागिरी आणि मुलांच्या गटात साताऱ्याची चमक ; अहिल्यानगरच्या मैदानावर वेग, दमदार रणनीती आणि रोमांचकारी संघर्ष

अहिल्यानगर – महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू झालेल्या 51 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी रोमहर्षक क्षणांचा मनसोक्त आनंद घेतला. मुलींच्या गटात धाराशिव, सोलापूर, ठाणे, सांगली, पुणे आणि रत्नागिरी यांनी प्रभावी कामगिरी केली, तर मुलांच्या गटात धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, सातारा, नाशिक आणि पुणे संघांनी दमदार विजय मिळवत स्पर्धेत जोरदार मुसंडी मारली.

मुली गटातील झंझावत प्रदर्शन
सकाळच्या पहिल्या सामन्यात धाराशिवच्या मुलींनी रायगडवर 1 डाव 32 गुणांनी (44-12) दणदणीत विजय मिळवला. संघातील मैथिली पवारने 4.20 मिनिटे पळती खेळ करत तब्बल 10 गुणांची कमाई करून सामन्याची शान वाढवली. राही पाटील (2.10 मि. संरक्षण व 2 गुण), मुग्धा वीर (3.10 मि. संरक्षण व 2 गुण), श्रावणी गुंड (3.20 मि. संरक्षण व 2 गुण) यांनीही भक्कम खेळ सादर केला. दुसऱ्या सामन्यात सोलापूरने धुळेचा 1 डाव 19 गुणांनी (33-14) पराभव केला. अश्विनी मांडवे (3 मि. संरक्षण व 4 गुण) आणि कल्याणी लामकाणे (3.01 मि. संरक्षण व 4 गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. धुळ्यातर्फे हर्षदा कोळी (6 गुण) हिने संघाचा मान राखला.

ठाणे संघाने चुरशीच्या लढतीत मुंबईचा 1 डाव 13 गुणांनी (29-16) पराभव केला. प्राची वांगडे (3 मि. संरक्षण व 4 गुण), वैष्णवी जाधव (नाबाद 2.20 मि. संरक्षण व 4 गुण) यांनी विजयात सिंहाचा वाटा उचलला.

रत्नागिरीने जालन्यावर 5 गुणांनी (36-31) अतिशय कडवी लढत देत विजय संपादन केला. रिद्धी चव्हाण (2, 3 मि. संरक्षण व 2 गुण) व वैष्णवी फुटक (8 गुण) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

अन्य सामन्यांचे निकाल:
सांगली विजय – नंदुरबार 1 डाव 32 (46-14), सातारा विजय – मुंबई उपनगर 9 गुणांनी (31-22), पुणे विजय – अहिल्यानगर 1 डाव 16 गुणांनी (24-8), नाशिक विजय – पालघर 1 डाव 17 गुण.

मुलांच्या गटात चुरस आणि थरार
धाराशिव संघाने रायगडवर 1 डाव 21 गुणांनी (39-18) मात केली. हारद्या वसावे (4.20 मि.) आणि राज जाधव (3.20 मि.) यांनी चमकदार पळतीचा खेळ केला. रायगडकडून ओम जगदाळेने 8 गुणांची आक्रमक खेळी केली.

सोलापूरने जालना संघाचा 1 डाव 8 गुणांनी (28-20) पराभव केला. अरमान शेख (3 मि. संरक्षण व 8 गुण) आणि शंभूराज चंदनशिव (2.50 मि. संरक्षण) चमकले. जालना संघाचा रोहित चारवंडेने 10 गुणांची आगळी कामगिरी करून सर्वांचे कौतुक मिळवले.

अहिल्यानगरने बीडचा 1 डाव 17 गुणांनी (31-14) पराभव करत घरच्या मैदानावर दमदार प्रदर्शन केले. साई लव्हाट (3.30 मि. संरक्षण) विशेष ठरला.

ठाणे संघाने रोमांचक लढतीत मुंबई उपनगरचा 7 गुणांनी (31-24) पराभव केला. ड्रीम रनमधून मिळवलेले 4 गुण विजयात निर्णायक ठरले. ओंमकार सावंत व वेदांत यांनी मोलाची कामगिरी बजावली.

साताऱ्याने मुंबई संघावर रोमांचक 1 गुणांनी (27-26) विजय मिळवला. अंतिम क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा सामना खेळवला गेला.

अन्य सामन्यांचे निकाल:
• नाशिक विजय – रत्नागिरी 1 डाव 11 गुणांनी (27-16)
• पुणे विजय – धुळे 1 डाव 27 गुणांनी (45-18)
• सांगली विजय – नंदुरबार 1 डाव 5 गुणांनी (22-17)

पहिल्या दोन दिवसातच स्पर्धेने उंचावला रोमांचाचा कळस
अत्यंत उत्साही वातावरणात आणि भरपूर प्रेक्षकांच्या उपस्थितीत सर्व सामने जोश व चुरशीने खेळले गेले. पुढील दिवसातील बाद फेरीतील सामने आणखी रंगतदार होतील अशी उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

९ महिन्यांच्या बाळावर आणि ९१ वर्षीय नागरिकावर एसीएस हॉस्पिटलमध्ये यशस्वी अतिजटिल ‘टॅव्ही’ व ‘पीडिए डिव्हाईस क्लोजर’ शस्त्रक्रिया

Next Post

सोलापुरात बाल भिकारी वाढले; आ. देशमुखांनी व्यक्त केली चिंता…

Related Posts

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!
मुख्य बातमी

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’
मुख्य बातमी

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!
मुख्य बातमी

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!

August 29, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
Next Post
सोलापुरात बाल भिकारी वाढले; आ. देशमुखांनी व्यक्त केली चिंता…

सोलापुरात बाल भिकारी वाढले; आ. देशमुखांनी व्यक्त केली चिंता…

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026