येस न्युज मराठी नेटवर्क ; अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील चीप्पा मेकॅनिकल कारखान्या बाहेरील ३५९० किलो वजनाची बांधकामाची लोखंडी सळई अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या सळईची किंमत जवळपास एक लाख रुपये आहे. ही चोरी १३ मे रोजी दुपारी साडेतीन ते १५ मे रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . प्रकाश पासकंटी या बांधकाम व्यवसायिकांनी ही फिर्याद दिली आहे . पोलीस हवालदार पवार या प्रकरणी तपास करीत आहेत.