येस न्युज मराठी नेटवर्क : पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात १६ मे रोजी केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २,६६६ वाहनांची तपासणी करण्यात आली. मास्क न वापरल्याने ४५३ नागरिकांविरुद्ध कारवाई करून २,२६,५०० ₹ दंड वसूल करण्यात आला. नियमांचे उल्लंघन केल्याने २ आस्थापनांविरुद्ध कारवाई करून २,००० ₹ दंड वसूल करण्यात आला . मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने ५०१वाहनांविरुद्ध कारवाई करून १,०५,६००₹ दंड वसूल करण्यात आला. नाकाबंदी दरम्यान ३६ वाहने जप्त करण्यात आली. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये यापुढे तरी नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये . घराबाहेर पडताना तोंडाला मास्क वापरावा तसेच सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.