मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारसमोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. त्यातच आता अधिवेशनावर कोरोनाचे सावट आले आहे. कोरोनाने विधानभवनात शिरकाव केला असल्याचे समोर आले आहे. अधिवेशन सुरु होण्याआधी 25 जण कोरोना बाधित झाले असल्याची माहिती आहे.अधिवेशनाच्या आधी दोन दिवस विधानभवन येथे कोरोनाच्या चाचण्या झाल्या होत्या. एकूण 3200 जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या होत्या. त्यातील 25 जण कोरोना बाधित झाले आहेत. यात पोलीस आणि माध्यम प्रतिनिधी असल्याची माहिती आहे. बहुतेक आमदारांनी खासगी कोरोना लॅबमध्ये चाचण्या केल्या आहेत.