सोलापूर : शहराचा covid-19 सोमवार दिनांक ३१ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. रविवारी रात्री १२ वाजता संपलेल्या २४ तासात सोलापूर शहरातील नवीन २२ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या कालावधीत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या व्यक्तींची संख्या ४४ आहे तसेच तिघांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. शहरातील ४५० व्यक्ती अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना बाधित रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक २६ मध्ये चार आणि प्रभाग क्रमांक २ व २४ मध्ये ३ रुग्ण आढळले आहेत.
