पंढरपूर : येथील पुंडलिक नगर मध्ये राहणाऱ्या गोविंद सबनीस यांच्या घरातून चोरीस गेलेला सोन्याचे दागिने चांदीचे शिक्के रोख रक्कम मोबाईल फोन असा एक लाख 18 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार कराड शहरातील एसटी स्टँड समोर थांबलेल्या संशयित दोन ईसमा कडे विचारपूस केली असता या गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे. या गुन्हेगारांकडून दोन लाख चोवीस हजार 863 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे दोन्ही गुन्हेगार एक सांगली जिल्ह्यातील व एक सातारा जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे या गुन्हेगारांविरुद्ध इस्लामपूर सांगली कराड येथे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.