• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकांना मोठा दिलासा, शालेय शिक्षण शुल्कामध्ये १५ टक्के कपात; सरकारी आदेश जारी!

Yes News Marathi by Yes News Marathi
August 13, 2021
in मुख्य बातमी
0
पालकांना मोठा दिलासा, शालेय शिक्षण शुल्कामध्ये १५ टक्के कपात; सरकारी आदेश जारी!
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात करोनाचं संकट निर्माण झाल्यापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे सर्व मुले घरीच असताना दुसरीकडे करोनामुळे आर्थिक परिस्थिती देखील बारगळली होती. त्यामुळे अनेक घरांमधली आर्थिक गणितं बिघडली होती. या पार्श्वभूमीवर शाळा बंद असून देखील आणि ऑनलाईन शिक्षण सुरू असून देखील पूर्ण शुल्क आकारण्यावर अनेक पालकांनी आक्षेप घेतला होता. त्यानुसार राज्य सरकारने आता शालेय शिक्षण शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याचा शासकीय आदेश काढला आहे. यासंदर्भातला निर्णय गेल्याच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. मात्र, त्यासंदर्भातला अध्यादेश कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता असल्यामुळे अखेर सरकारने सरकारी आदेश काढला आहे.

करोनामुळे अडचणीत आलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी १५ टक्के शुल्क माफीचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला होता. मात्र, खासगी शाळांमधील शुल्क नियमनामध्ये हस्तक्षेप झाल्यास सरकारचा निर्णय कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता होती. त्यावर अखेर सरकारी आदेश काढून तोडगा काढण्यात आला आहे.

करोनामुळे उत्पन्नावर परिणाम झालेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी खासगी शाळांचे शुल्क १५ टक्क्यांनी कमी करता यावे, यासाठी ‘महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमा’त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा किंवा साथरोग प्रतिबंधक अधिनियम लागू असल्यास आणि शाळा तीन महिन्यांहून अधिक काळ बंद ठेवाव्या लागल्यास खासगी शाळांच्या शुल्करचनेचे नियमन करण्याचे अधिकार काममस्वरूपी राज्य सरकारला मिळाले असते. या दृष्टीने विभागाने अध्यादेश काढण्याची तयारी सुरू केली.

सरकारी आदेश कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नसल्याने अध्यादेशाबाबत शालेय शिक्षण विभाग आग्रही होता. महत्त्वाचे म्हणजे अध्यादेशाच्या पर्यायाला महाधिवक्त्यांनीही काही अटींवर हिरवा कंदील दाखवला होता. तरीही सरकारी आदेशाबाबत मंत्री आग्रही असल्याने हा अध्यादेश २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापुरता असावा, असा मध्यममार्ग पुढे आला. परंतु, करोनामुळे उद्भवलेली अपवादात्मक परिस्थिती पुढील वर्षीही कायम राहिल्यास शुल्कवाढीची टांगती तलवार पुढील वर्षीही कायम राहणार आहे.

Previous Post

पंढरपुरातील चोरीचा 2 लाख 84 हजार मुद्देमाल हस्तगत

Next Post

आयुर्वेदतज्ज्ञ बालाजी तांबे यांचे निधन कोरोनामुळे

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
आयुर्वेदतज्ज्ञ बालाजी तांबे यांचे निधन कोरोनामुळे

आयुर्वेदतज्ज्ञ बालाजी तांबे यांचे निधन कोरोनामुळे

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026