माऊली महाविद्यालय वडाळा, सोलापूर इतिहास संशोधन मंडळ सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ८मार्च २०२५रोजी माऊली महाविद्यालय वडाळा याठिकाणी राष्ट्रीय इतिहास परिषद १८ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले.

अधिवेशनाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शिरीष भोसले यांनी अधिवेशनाची भूमिका स्पष्ट केली अधिवेशनाचे उद्घाटन मोहोळ मतदारसंघाचे आमदार मा. राजाभाऊ खरे यांनी करून आपले विचार मांडताना आजच्या काळात प्रत्येकाला आपल्या इतिहासाची माहिती असली पाहिजे याची जाणीव करून दिली
सोलापूर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय गायकवाड यांनी आपल्या अधिवेशनाची कार्यप्रणाली स्पष्ट करताना म्हणाले की आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवातील अस्तित्वाची लढाई दूर करावयाची असेल तर घडलेला इतिहास विकृत स्वरूपात बिघडवण्यापेक्षा त्या घटनातील पार्श्वभूमी पाहून त्याचे वस्तुनिष्ठ आकलन लोकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे म्हणूनच या अधिवेशनाला “इतिहासातील नवदृष्टिकोन” हा मुख्य विषय घेऊन अधिवेशनाच्या स्वरूपाची माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.श्रीमंत कोकाटे आपल्या ओघवत्या शैलीत इतिहासाचे आजच्या काळातील स्वरूप मांडताना भारतीय इतिहासातील ज्या विविध संकल्पना समाजाच्या बाहेर आलेले आहेत त्याचा यथायोग्य अभ्यास झाला पाहिजे आणि त्याची मांडणी केली पाहिजे यामध्ये आजच्या काळामध्ये पर्यावरणाची समस्या मोठ्या स्वरूपात वाढल्याने इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एका पत्राचा दाखला देत त्या काळातील राजे ही कशा स्वरूपात पर्यावरणाची जाणीन ठेवत होते याची जागृती करून दिली आज पर्यावरणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचा अभ्यास करून त्या समस्येचा उकल काढला पाहिजे अशी भूमिका मांडली त्याचप्रमाणे ८मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन याचे औचित्य साधून इतिहासाचे प्राचीन दाखले देत सृष्टीवर प्रथमता स्त्रियांनीच सर्व गोष्टीचा शोध लावला याची पुराव्यासहित माहिती दिली. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम (काका) साठे, यांनी अध्यक्षीय भाषणात आपले मौलिक विचार करताना आजच्या काळातही इतिहासाचे महत्त्व पटवून त्याची जाणीव समाजाला करून दिली पाहिजे अशी भूमिका मांडली. उद्घाटन सत्रामध्ये विद्यापीठाचे सिनेट व एम.सी सदस्य सचिन गायकवाड, इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. विष्णू वाघमारे, अकॅडमी कौन्सिल व सिनेट सदस्या प्राचार्य डॉ. वैशालीताई साठे, इतिहास संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी वाघमोडे प्राचार्य सोपानराव जावळे त्याचप्रमाणे बीजभाषक अमरावती विद्यापीठातील प्रा.डॉ. संतोष बनसोड व्यासपीठावर उपस्थित होते.

अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात बीजभाषक म्हणून लाभलेले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे संतोष बनसोड यांनी इतिहासातील नवदृष्टिकोन मांडताना भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर घटनेच्या माध्यमातून मिळालेले स्वातंत्र्य समता बंधुता याची जाणीव करून या घटनेच्या माध्यमातून समाजातील सर्व समस्या कशा प्रकारे सोडवण्यासाठी कलमांची निर्मिती केली याची माहिती देत भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या अधिकाराची व हक्काची जाणीव या भारतीय राज्यघटनेत दिलेले असून ती माहिती जर आपण लोकापर्यंत पोहोचलो नाही आपण त्याबद्दल भाष्य केले नाही किंवा त्याबद्दल लिहिले नाही तर भावी काळात आपल्या देशाला येणाऱ्या समस्याला आपणच जबाबदार राहू म्हणूनच भारतातील स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतरच्या इतिहासाची जाणीव करून दिली आणि त्याची मांडणी करताना प्रत्येकाला आपली जबाबदारीची भूमिका पार पाडली पाहिजे असे मत मांडले या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य सोपान जावळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारताच्या सध्य परिस्थितीला इतिहासाचे दाखले देत आपली भूमिका स्पष्ट केली.

अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रामध्ये विविध संशोधकांचे पेपर वाचन झाले या राष्ट्रीय परिषदेला आठ राज्यातील संशोधकांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये डाॅ अमिता जावळे, कल्याण श्रावस्ती, वैशाली डौले इत्यादींनी संशोधन पेपरचे वाचन केले संशोधन पेपर वाचण्यासाठी प्राचीन इतिहास विभागासाठी डॉ.रविकिरण जाधव आणि डॉ. किशोर थोरे मध्ययुगीन इतिहास विभागासाठी प्रा.डॉ. शिवाजी वाघमोडे व डॉ. मनोज कसबे आधुनिक इतिहास विभागासाठी प्रा. डॉ. राजेंद्र गायकवाड आणि डॉ.किशोर जोगदंड यांनी सत्राध्यक्षाची भूमिका पार पडली.
अधिवेशनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी मानवाच्या जीवनातील इतिहासाचे महत्व पदोपदी कशाप्रकारे होते याची जाणीव करून दिली. समारोप सत्राचे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सभासद व संस्था संचालिका वैशालीताई साठे यांनी इतिहासा विषय आपली भूमिका मांडली समारोपाच्या सत्रात प्रा. डॉ. दिगंबर वाघमारे डॉ किशोर थोरे डॉ. किशोर जोगदंड इत्यादींनी अधिवेशन यशस्वी झाल्याचे श्रेय स्पष्ट केले अधिवेशनाची प्रास्ताविक डॉ. विकास शिंदे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. परमेश्वर हाटकर, प्रा. डॉ. परमेश्वर सूर्यवंशी डॉ. बिरादार मॅडम, डॉ.पाटील यांनी केले संपूर्ण अधिवेशनाचे प्रक्षेपण प्रा. डॉ. सतिश घोरपडे यांनी केले
इतिहास अधिवेशनाला संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बाबा साठे , जयदीपराजे साठे ,समन्वयक डॉ. बालाजी गंगावणे सोलापूर इतिहास संशोधन मंडळाचे सहसचिव प्रा. डॉ
दिगंबर वाघमारे, खजिनदार डॉ. किशोर थोरे,सदस्य प्रा..डाॅ. टी एन शिंदे, प्रा..डाॅ.मनोज कसबे,डॉ.अशिष रजपूत, डॉ. अमिता जावळे इत्यादी उपस्थित होते.











