सोलापूर झेडपी चे सीईओ कुलदीप जंगम यांची शासनाने अवघ्या 17 महिन्यातच बदली केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अप्पर आयुक्त या रिक्त पदावर त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी 2022 च्या बॅचचे आयएएस अधिकारी कुशल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जैन यांनी यूपीएससीमध्ये 40 वा रँक मिळवून भारतात नावलौकिक मिळवलाय. झेडपीचे विद्यमान सीईओ कुलदीप जंगम यांच्या समवेत झेडपीच्या नव्या सदस्यांच्या आत्ता ओळखी होऊ लागल्या असतानाच त्यांची शासनाने बदली केली. आता नव्या झेडपी सदस्या बरोबरच सोलापूर झेडपी ला नवा सीईओ देखील मिळणार आहे. आषाढी वारीच्या तोंडावर ही बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आषाढी वारीमध्ये पुणे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील यात्रे विषयक सर्व कामांचे टेंडर काढण्याचे अधिकार सोलापूर झेडपी ला मिळाले असताना त्यांची बदली झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

