• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जामश्री–इलिझियम सोलापूर ओपन महिला आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जागतिक दर्जाचा अनुभव

by Yes News Marathi
December 25, 2025
in मुख्य बातमी
0
जामश्री–इलिझियम सोलापूर ओपन महिला आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जागतिक दर्जाचा अनुभव
0
SHARES
78
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नेदरलॅंड्सची अव्वल मानांकित टेनिसपटू एम्मा व्हॅन पॉपेल हिने उलगडले यशाचे रहस्य; सोलापूरच्या आदरातिथ्याने व थेट विमानसेवेने भारावून गेल्याची भावना व्यक्त

सोलापूर – जामश्री–इलिझियम सोलापूर ओपन महिला आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने खास नेदरलॅंड्स येथून आलेली जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित टेनिसपटू एम्मा व्हॅन पॉपेल हिच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तिच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस कामगिरीमागील रहस्य जाणून घेताना तिने कडक शिस्त, सात्विक आहार, कुटुंबीयांकडून मिळणारे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि दररोज किमान ०६ तास न थकता केलेली कठोर ट्रेनिंग हेच आपल्या यशाचे खरे गमक असल्याचे स्पष्ट केले.

सोलापूरबाबत बोलताना एम्मा व्हॅन पॉपेल हिने सांगितले की, सोलापूरची हवा, वातावरण आणि येथील लोक अतिशय छान आहेत. ती पहिल्यांदाच भारतात आली असून, इथले आदरातिथ्य पाहून ती मनापासून भारावून गेली आहे. सोलापूरमधील शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ तिला फारच आवडले असून, याचा उल्लेख तिने आवर्जून केला.

सोलापूरची थेट विमानसेवा सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना एम्मा व्हॅन पॉपेल हिने सांगितले की, “मी नेदरलॅंड्स येथून मुंबईला उतरले आणि तेथून थेट विमानाने सोलापूरला पोहोचले. त्यामुळे माझ्या प्रवासाचा मोठा वेळ वाचला आणि मला सोलापूरमध्ये सरावासाठी अधिक वेळ मिळाला.” सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या सोलापूर विकास मंचचे तिने मनापासून आभार मानले.

आज तिचा सामना संपल्यानंतर तिला सोलापूरची चादर भेट देण्यात आली. विशेष बाब म्हणजे आज ख्रिसमसचा दिवस असल्याने, आपल्या देशापासून व कुटुंबापासून दूर असलेल्या परदेशात अशा प्रकारच्या आपुलकीने केलेल्या सत्कारामुळे ती भावूक झाली. “भारत आणि सोलापूरच्या लोकांना मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही,” हे तिचे शब्द ऐकून उपस्थितांच्या मनाला विशेष समाधान वाटले.

या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामागे सोलापूर डिस्ट्रिक्ट लॉनटेनिस असोसिएशनचे सचिव राजीव देसाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमने गेल्या १० वर्षांपासून घेतलेली अथक मेहनत मोलाची ठरली आहे. त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला नाणेफेक करण्याची संधी मिळाली. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेसाठी सध्या १३ देशांतील ४६ अव्वल मानांकित महिला टेनिसपटू सोलापूरात दाखल झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर, सर्व सोलापूरकरांची नैतिक जबाबदारी आहे की या सर्व विदेशी तसेच देशी महिला खेळाडूंचे मनापासून आदरातिथ्य करावे, जेणेकरून सोलापूर सोडताना त्या शहराची एक सकारात्मक, समृद्ध आणि आपुलकीची प्रतिमा आपल्या सोबत घेऊन जातील. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे विजय कुंदन जाधव, अॅड.दत्तात्रय अंबुरे, अर्जुन रामगिर, डॉ. दिलीप जोशी, राजेश नाईक, कार्तिक अंबुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

विद्यार्थ्यांची सहल न्यायची आहे? मग लालपरीनेच जा;अन्यथा थेट कारवाई

Next Post

वादग्रस्त सपाटे यांचे निलंबन मागे

Next Post
वादग्रस्त सपाटे यांचे निलंबन मागे

वादग्रस्त सपाटे यांचे निलंबन मागे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In