आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे
यंदाच्या जागतिक महिलादिनानिमित्याने कुंभार वेस येथे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले आहे.
कुंभार वेस येथे व्यापारी हमाल तसेच ग्रामीण भागातून येणारे लोक तसेच मंगळवार बाजार ला जाणारे लोक येतात.

या गजबज अश्या जिथे नेहमीच खरेदी विक्रीचे व्यवहार होतात अश्या भुसार गल्लीत थोडक्यात कुंभारवेस येथे यंदाच्या उन्हाळ्यात कुण्या जीवाला पाण्याशिवाय तडपु नये किंवा जीवघेण्या उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊन आजारी पडू नये म्हणूनच आजपासून इथ पाणपोईची सोय केलेली आहे.

जिथे रोजच्या रोज स्वच्छ व फिल्टर जारचे थंड पाणी सर्वांनाच सुखावेल व तहानलेल्याची तृषा कमी करेल
हयांच्यासाठी एका ज्येष्ठांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ येणाऱ्या काही काळापुरते पाणपोई पाण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा बोझा उचलून निनावी केलेल्या हया दानाचे आस्थाच्या वतीने रितसर जनसामान्यांच्या सेवेत अर्पण करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे रविकांत तंबाके,राजू हौशेट्टी, संजय पाटील, बाळू भुमकर, हे सर्वजण उपस्थितीत तसेच कुंभार वेस येथील व्यापारी दयानंद आडके, आनंद तगी, अरुण आडके,आयुब पठाण, अरुण पठाण, जमादार , आकाश भुमकर संजय गुळगी या सर्वांचे उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरती व उद्घाटन करण्यात आले आहे त्यावेळी व्यापाऱ्यांनी आपले मनोगतात म्हटले की कुंभारवेस येथे आस्था रोटी बँकेने पाणपोई छान उपक्रम आयोजित केले आहे त्यांचे कार्य खूप छान असते.
अप्रत्यक्षपणे देणगीदारांच्या देणगीतून
आस्थाचे अध्यक्ष सर्वेसर्वा विजय छंचुरे, पुष्कर पुकाळे, छाया गंगणे ,कांचन हिरेमठ ,निलिमा हिरेमठ , मंगल पांढरे, स्नेहा मेहता, नीता अकुडे, संगीता छंचुरे ,लक्ष्मी कुलकर्णी, सुवर्णा पाटील, सर्व आस्था रोटी बँक टीम.










