मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगतापने तिच्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत केले आहे. इतकच नाही तर तिने स्वतःच सुंदर आरासही केली आहे. वीणा सुंदर मराठमोळ्या पारंपरिक वेशात तयार होऊन बाप्पाची पूजा करताना दिसत आहे .
वीणाने स्वतःच्या हाताने बाप्पाच्या आगमनाची तयारी केली होती.याशिवाय सुंदर आरासही केली आहे. जी फारच आकर्षक दिसत आहे.सुंदर धाग्याचे गोंडे लटकवत तिने आरास साकारली आहे.बिग बॉस फेम वीणा सध्या कोणत्याही मालिकेत दिसत नाही.काही महिन्यांपूर्वी ती आई माझी काळूबाई मालिकेत दिसली होती.पण तिने अर्ध्यातूनच मालिका सोडली होती.सुंदर लाल रंगाच्या लेहंग्यात ती फारच आकर्षक दिसत आहे. सोशल मीडियावर वीणा फारच सक्रिय असते.