• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार – उर्मिला मातोंडकर

Yes News Marathi by Yes News Marathi
December 1, 2020
in मुख्य बातमी
0
मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार – उर्मिला मातोंडकर
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : मी सिनेसृष्टीत कारकीर्द सुरु केली तेव्हा मी साध्यासुध्या मराठी घरातून आलेली मुलगी आहे. मी ‘पिपलमेड’ स्टार आहे त्याचप्रमाणे मी ‘पिपलमेड लीडर’ व्हायला आवडेल असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. करोनाच्या कठीण काळात महाविकास आघाडीने खूप चांगलं काम केलं आहे. शिवसेना प्रवेशासाठी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेसाठी माझं नाव दिल्याचं मला कळतं आहे. कंगनाने काही टीका केली तर तुम्ही उत्तर देणार का? त्यावर मी त्याबाबत काहीही प्रतिक्रिया देणार नाही असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. आजच उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांनी मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे असं म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचा दर्जा वाढावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे असं शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं. शिवसेनेच्या भक्कम अशा महिला आघाडीचा मी एक भाग झाले याचा मला सार्थ अभिमान आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. वर्षभरात या महाविकास आघाडीने खूप चांगलं काम केलं आहे. करोनाचं संकट असो, वादळ असो किंवा इतर आपत्ती असो मी या सरकारला कायमच चांगलं काम करताना पाहिलं आहे. कुठल्याही विशिष्ट धर्माच्या लोकांना या सरकारने विशेष वागणूक दिली नाही. सगळ्यांना समान वागणूक दिली ही बाब मला खूप महत्त्वाची वाटते असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

सवंग आरोप करुन मला प्रसिद्धी मिळवायची नाही. कारण तो अत्यंत सोपा मार्ग असतो. काँग्रेसमध्ये होते तेव्हा मी पदाची अपेक्षा केली नव्हती. आज शिवसेनेत आले तरीही पदाची अपेक्षा नाही. मला लोकांसाठी काम करायचं आहे म्हणून मी शिवसेनेत आले आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

देशाच्या राजकारणात सध्या विषारी वातावरण आहे असंही भाष्य उर्मिला मातोंडकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केलं. तसंच बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचा अत्यंत किळसवाणा प्रयत्न मधल्या काळात झाला असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. मी तेव्हाही कुणाच्या विरोधात बोलले नाही, आताही बोलत नाही. मी महाराष्ट्राच्या बाजूने बोलते आहे असंही उर्मिला यांनी स्पष्ट केलं.

Previous Post

कोरोनाची लस सर्वात आधी ‘या’ लोकांना देणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

Next Post

सत्तेच्या स्वार्थासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र – उदयनराजे भोसले

Related Posts

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
मुख्य बातमी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 13, 2026
सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!

September 13, 2026
मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार
मुख्य बातमी

मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार

September 13, 2026
लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…
मुख्य बातमी

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

September 12, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
Next Post
सत्तेच्या स्वार्थासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र – उदयनराजे भोसले

सत्तेच्या स्वार्थासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र - उदयनराजे भोसले

ताज्या बातम्या

दुष्काळ पाहणीसाठी संपूर्ण महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्ह्यात सर्वत्र पिकांची प्रत्यक्ष पाहणी

दुष्काळ पाहणीसाठी संपूर्ण महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्ह्यात सर्वत्र पिकांची प्रत्यक्ष पाहणी

September 13, 2026
निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण

निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण

September 13, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026