• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा; पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2023
in मुख्य बातमी
0
राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा; पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान
0
SHARES
0
VIEWS

वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आणि पावसाचं पाणी शिरलं. दरम्यान या नुकसानाचे ना पंचनामे होतायंत ना नुकसान भरपाई मिळत आहे. अशा परिस्थितीत करायचं काय, जगायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
मुंबई: अवकाळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आहे. राज्यावरील अवकाळीचं संकट काही केल्या कमी होत नाही. पुन्हा एकदा अवकाळीनं अनेक भागांत अवकृपा केली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांमधील तब्बल 28 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. नाशिक जिल्ह्यातील देवळा, नांदगाव, निफाड, सिन्नर, कळवण,ईगतपुरी, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान केलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भ अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पुण्यातही मुसळधार पावसासह काही भागात गारपीट झाली. तर तिकडे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याला अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. या वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, आणि पावसाचं पाणी शिरलं. दरम्यान या नुकसानाचे ना पंचनामे होतायंत ना नुकसानभरपाई मिळत आहे. अशा परिस्थितीत करायचं काय, जगायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. राज्यातील अवकाळी पावसाचा आढावा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीवरील उपाययोजनांबाबत आज मुख्यमंत्री महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथी गृह येथे ही बैठक पार पडणार आहे. एक वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलेला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि अधिकारी उपस्थित असणार आहेत.
अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात 6 हजार 685 हेक्टरवरील शेतीला फटका बसल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झालंय. जवळपास 12 हजार 483 शेतकर्‍यांचे नुकसान या अवकाळीने केलं आहे. आधीच मागील अतिवृष्टीची नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी हैराण असताना पुन्हा झालेल्या अवकाळीने अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.
वाशिम
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलीच तारांबळ उडाली आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, घरात पावसाचे पाणी शिरले. तर मालेगाव तालुक्यात ही गारपीट फळबागांना आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.
अकोला
अकोल्यातील पातूर तालूक्यातील आस्टूल, पास्टूल गावाला पुन्हा वादळी वारा, पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे. कांदा आणि लिंबू पिकाचं नुकसान झाले आहे. महिनाभरात तब्बल चौथ्यांदा परिसराला गारपीटीचा फटका बसला आहे. धाराशिव कळंब येथे भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यात गारपीट झाली. 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान ही गारपीट झाली. कन्नड तालुक्यातील जेहुर अनो बोलठान या गावची ही दृश्य आहेत. इतर गावातही मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे.

Previous Post

म्युझिक आर्ट डान्स अकॅडमी यांच्या उन्हाळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मराठवाड्याची राजधानी छ. संभाजीनगरमध्ये ‘बीआरएस’ची 24 एप्रिलला जाहीर सभा, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव राहणार उपस्थित

Related Posts

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

June 19, 2026
TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!
मुख्य बातमी

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!

June 18, 2026
वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
Next Post
मराठवाड्याची राजधानी छ. संभाजीनगरमध्ये ‘बीआरएस’ची 24 एप्रिलला जाहीर सभा, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव राहणार उपस्थित

मराठवाड्याची राजधानी छ. संभाजीनगरमध्ये 'बीआरएस'ची 24 एप्रिलला जाहीर सभा, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव राहणार उपस्थित

ताज्या बातम्या

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026