सोलापूर : जिल्हा परिषदेत सुरू झालेल्या पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीमचे जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक , विस्तार अधिकारी , गटविकास अधिकारी आदींना १७ जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे प्रशिक्षण देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या पीएफएमएस प्रणाली ची उपयुक्तता पाहून सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही प्रणाली तात्काळ लागू करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. जिल्ह्यातील सरपंच ग्रामसेवक , अधिकारी व कर्मचारी अशा जवळपास अडीच हजार व्यक्ती प्रशिक्षणासाठी सहभागी झाल्या होत्या. ऋषी क्षणापूर्वी कोरोना मुक्त गाव स्पर्धेचे देखील प्रशिक्षण मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचं पाटील यांनी सर्वांना दिले. तसेच ‘एक पद एक वृक्ष’ या योजनेद्वारे वृक्षांचे संगोपन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.