• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे

Yes News Marathi by Yes News Marathi
September 21, 2026
in इतर घडामोडी
0
पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे
0
SHARES
1
VIEWS

संत नामदेव महाराजांच्या जीवनकार्याचा आध्यात्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा जतन करण्यावर भर

सोलापूर : संत नामदेव महाराज यांच्या जीवनकार्य, विचार व भक्तीपरंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पंढरपूर येथे भव्य संत नामदेव महाराज स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे. या स्मारकाच्या माध्यमातून आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अनुभव देणारे केंद्र विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. तरी या स्मारकाचे काम दोन टप्प्यात पूर्ण करावे. पहिल्या टप्प्यात १०० कोटीची कामे तर दुसऱ्या टप्प्यात ५० कोटीची कामे घ्यावी व भव्यदिव्य स्मारक निर्माण करावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

संत नामदेव महाराज स्मारक जिल्हा स्तरीय समिती बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अमित निमकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, भूमी अभिलेख अधीक्षक एम. मगर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, संग्राम पवार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, श्री संत नामदेव महाराजांच्या स्मारकाच्या ९३.५४ कोटी च्या आराखड्यास राज्य शासनाच्या उच्च अधिकार समितीने मंजुरी दिलेली आहे. परंतु येथील प्रस्तावित कामे सुमारे दीडशे कोटी रुपये असल्याने पहिला टप्पा शंभर कोटीचा तर दुसरा टप्प्यासाठी वाढीव ५० कोटी रुपयाचा करण्याबाबतचे निर्देश देऊन प्रशासनाने वाढीव आराखडा प्रस्ताव शासनाला सादर करण्याबाबतही त्यांनी सूचित केले. तसेच समितीने मंजूर केलेल्या पहिल्या टप्प्याप्रमाणे प्रशासनाने पुढील कार्यवाही करावी. तसेच पंढरपूर येथील मूळ संत नामदेव महाराजांचे मंदिराचा विकास आराखडा ही या वाढीव टप्प्यात घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

श्री क्षेत्र देहू-आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, पालखीतळ आणि नेवासा आदी क्षेत्रांतील मूलभूत सुविधांच्या विकासासाठीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. प्रस्तावित स्मारकासाठी मौजे शेगाव-दुमाला येथील गट क्रमांक १५७ मधील रेल्वेची सुमारे ६.१० हेक्टर जागा प्रस्तावित आहे. त्यापैकी सुमारे ४.१० हेक्टर क्षेत्रामध्ये स्मारक विकसित करण्याची संकल्पना आहे. हे ठिकाण श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून अंदाजे २.५० किलोमीटर अंतरावर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकीयन यांनी देऊन उच्च अधिकार समितीने ९३.५४ कोटीचा आराखड्याला मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्मारकासाठी दुसरा टप्प्यासाठी वाढीव निधीची मागणी प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

स्मारक परिसरात संत नामदेव महाराजांचा पुतळा, मुख्य स्वागत कमान, माहिती केंद्र, स्मरणिका दुकाने, वाचनालय व ध्यान केंद्र, वसतिगृह, भजन-कीर्तन व पारायणासाठी खुली जागा, संत नामदेव महाराज जीवनचरित्र संग्रहालय, संतग्राम संग्रहालय, कार्यालय, उपहारगृह आदी सुविधा प्रस्तावित आहेत. यासोबतच सौरऊर्जा, वृक्षारोपण, पावसाचे पाणी साठवण, विद्युतीकरण आणि सीमा भिंत यांसारख्या अनुषंगिक कामांचाही समावेश आहे.

स्मारकातील संग्रहालयात संत नामदेव महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सादर करण्याची संकल्पना आहे. जन्म, विठ्ठलभक्ती, संत ज्ञानेश्वरांची भेट, संत गोरा कुंभार, विसोबा खेचर, उत्तर भारत व पंजाबमधील प्रवास, अभंगपरंपरा आणि ‘नामदेव पायरी’ आदी विषयांचा जीवनप्रवासामध्ये समावेश प्रस्तावित आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी सांगितले.

‘संतग्राम’मधून संतपरंपरेचा परिचय
स्मारक परिसरातील ‘संतग्राम’ या संकल्पनेत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत दामाजीपंत आणि संत सावता माळी आदी संतांच्या जीवनकार्याचा अनुभवात्मक पद्धतीने परिचय करून देण्याचे प्रस्तावित आहे. संत नामदेव महाराज यांच्या समता, समानता, भक्ती आणि आध्यात्मिक विचारांचा वारसा जतन करण्याबरोबरच पंढरपूरच्या धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने या स्मारकाची संकल्पना मांडण्यात आली आहे.

आध्यात्मिक-सांस्कृतिक केंद्राची संकल्पना
संत नामदेव महाराज यांच्या जीवनकार्य व शिकवणीवर आधारित एक जिवंत आध्यात्मिक-सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक मूल्यांचा संगम साधत संत नामदेव महाराजांच्या जीवनप्रवासाचे प्रभावी सादरीकरण करण्याची संकल्पना आहे. संग्रहालय, संशोधन केंद्र, डिजिटल संग्रह, वाचनालय, बहुउद्देशीय रंगमंच आणि ऑडिटोरियमच्या माध्यमातून अभ्यागतांना आध्यात्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक अनुभव देण्याचे नियोजन आहे.

या आराखड्यामध्ये संत नामदेव महाराज यांचे स्मारक, इतर संतांचे समारक, बांधकाम, लँडस्केप, अंतर्गत मार्ग, विद्युत व प्लंबिंग कामे, संग्रहालय, अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही, सौरऊर्जा प्रणाली, पुतळे व म्युरल्स, प्रवेशद्वार तसेच इतर अनुषंगिक कामांचा समावेश आहे.

Previous Post

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

Next Post

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

Related Posts

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती
इतर घडामोडी

आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती

September 19, 2026
वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!
इतर घडामोडी

वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!

September 19, 2026
Next Post
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026