सोलापूर महापालिकेने भाडेतत्त्वावर मेजर आणि मिनी शॉपिंग सेंटर मधील जे गाळे दिले आहेत त्यामध्ये सुमारे 70 टक्के पोट भाडेकरू आहेत. हस्तांतर केले जात नाही… शिवाय महापालिकेला भाडे देखील वेळेवर मिळत नाही त्यामुळे आता महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी या सर्व गाळ्यांमधील पोट भाडे करू शोधून काढा असे आदेश दिले आहेत. सोलापूर महापालिकेचे मेजर आणि मिनी शॉपिंग सेंटर मध्ये सुमारे 1385 गाळे आहेत. यातून महापालिकेला वर्षासाठी अवघे साडेतीन ते चार कोटी रुपये मिळतात. महापालिकेच्या अनेक मेजर शॉपिंग सेंटर मधील गाळे लाखो रुपये घेऊन परस्पर बेकायदेशीर पणी विकले गेले आहेत. मेजर शॉपिंग सेंटर मधील गाळ्याची भाडे वाढ करणे तसेच पोट भाडेकरू वर कारवाई करण्याच्या ठोस कारवाईमुळेच तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाली होती. आता हा खूप मोठा विषय विद्यमान आयुक्तांनी हातात घेतला आहे त्यामुळे त्यातून काय निष्पन्न होईल हे लवकरच सोलापूर शहराला समजेल.











