• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आयटीएफ टेनिस स्पर्धेत तीन मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का..

by Yes News Marathi
December 24, 2025
in इतर घडामोडी
0
आयटीएफ टेनिस स्पर्धेत तीन मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का..
0
SHARES
63
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जामश्री – इलिझियम सोलापूर ओपन 2025

महिलांच्या $ 30,000/- रकमेच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत तीन मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का..

सोलापूर – 24 डिसेंबर 2025 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ओॲसिस, प्रिसीजन, इलिझियम-जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत जामश्री – इलिझियम सोलापूर ओपन 2025 महिलांच्या $30,000/- रकमेच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत रशियाच्या मारिया गोलोविना, भारताच्या माया राजेश्वरन रेवती, फ्रान्सच्या सेनिया इफारमोव्हा यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला. 

एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत रशियाच्या बिगर मानांकित मारिया गोलोविना हिने अव्वल मानांकित कोरियाच्या सोह्यून पार्कचा 6-1, 7-5 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.  भारताच्या माया राजेश्वरन रेवती हिने पाचव्या मानांकित झील देसाईचा 7-5, 7-6(5) असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. फ्रान्सच्या सेनिया इफारमोव्हा हिने भारताच्या चौथ्या मानांकित अंकिता रैनाचा 6-3, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. 

भारताच्या आठव्या मानांकित वैष्णवी आडकर हिने डेन्मार्कच्या एलेना जमशिदीचे आव्हान 7-5, 6-2 असे संपुष्टात आणले. सहाव्या मानांकित वैदेही चौधरीने क्वालिफायर सोहा सादिकवर 6-1, 6-1 असा सहज विजय मिळवला. दुसऱ्या मानांकित श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती हिने आकांक्षा नित्तूरेला 6-4, 6-0 असे नमविले.  

निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: एकेरी:  
मारिया गोलोविना(रशिया) वि.वि.सोह्यून पार्क(कोरिया) [1] 6-1, 7-5; 
सेनिया इफारमोव्हा(फ्रांस)वि.वि.अंकिता रैना(भारत)[4] 6-3, 6-3;
वैदेही चौधरी(भारत)[6] वि.वि.सोहा सादिक(भारत)6-1, 6-1;
एम्मा व्हॅन पॉपेल (नेदरलँड)वि.वि.मारिया टकाचेवा(रशिया)[3] 2-2सामना सोडून दिला;
माया राजेश्वरन रेवती(भारत)वि.वि. झील देसाई(भारत)[5] 7-5, 7-6(5);
वैष्णवी आडकर(भारत)[8] वि.वि. एलेना जमशिदी(डेन्मार्क)7-5, 6-2;
श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती(भारत) [2]वि.वि. आकांक्षा नित्तूरे(भारत)6-4, 6-0; 

दुहेरी: पहिली फेरी: 
लुंडा कुम्होम/ तनुचापोर्न योंगमोड(थायलंड)वि.वि.आकांक्षा नित्तूरे(भारत)/सोहा सादिक(भारत) 2-6, 7-6(8), 10-5;वैष्णवी आडकर [2] /अंकिता रैना(भारत)वि.वि.पूजा इंगळे/ मधुरिमा सावंत(भारत)6-2, 7-6(4); श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती [4] /वैदेही चौधरी(भारत)वि.वि. पोलिना बखमुतकिना(बेलारूस)/मारिया गोलोविनाव्स 6-2,6-2

Previous Post

ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी एक खिडकी कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद आज २३० अर्ज दाखल…

Next Post

NOC घेण्यासाठी 1435 अर्ज…. सोलापूर महापालिकेत तोबा गर्दी..

Next Post
NOC घेण्यासाठी 1435 अर्ज…. सोलापूर महापालिकेत तोबा गर्दी..

NOC घेण्यासाठी 1435 अर्ज…. सोलापूर महापालिकेत तोबा गर्दी..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In