सोलापूर शहरात 11 जणांना कोरोना
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा covid-19 चा गुरुवार दिनांक 12 ऑगस्ट चा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात नवीन ६०८ व्यक्तींना कोरोना झाला असून आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातील ४ हजार ७६८ व्यक्ती उपचार घेत आहेत. 576 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनाबाधितांच्या तालुकानिहाय आढावा घेतला असता माळशिरस आणि माढा तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी 148 नवीन रुग्ण आढळले आहेत, पंढरपूर तालुक्यात 98, मोहोळ तालुक्यात 45, बार्शी तालुक्यात 44 ,करमाळा तालुक्यात 83 मधील रुग्ण आढळले आहेत. आज जिल्ह्यामध्ये म्यूकरमायकोसिसचे नवीन तीन रुग्ण आढळले आहेत.
सोलापूर शहरात कोरोना चे नवीन अकरा रुग्ण आढळले असून बारा ऋग्न कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत सोलापूर शहरातील 65 व्यक्ती अद्याप धोरणावर रूग्णालयात उपचार घेत आहेत.